Vande Bharat Train: मुंबईतून फक्त सहा तासांत गाठता येणार गुजरात! वंदे भारत ट्रेनचं वेळापत्रक जाहीर
मुंबई, 29 सप्टेंबर: भारतातील पहिली स्वदेशी विकसित ‘वंदे भारत’ ट्रेन गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणार आहे. आता या ट्रेनचं वेळापत्रक समोर आलं असून ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. सुरत, वडोदरा आणि अहमादबाद या तीन स्थानकांवर ही ट्रेन थांबणार आहे. ही ट्रेन मुंबई सेंट्रलपासून सकाळी 6:10 वाजता सुटेल आणि दुपारी 12:10 वाजता गांधीनगर स्टेशनला पोहोचेल. तर दुपारी 2:05 वाजता गांधीनगरपासून ट्रेन सुटेल आणि रात्री 8:35 मुंबई सेंट्रल पोहोचेल. अलीकडेच वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे. ट्रेनमध्ये ‘कवच’ तंत्रज्ञान (ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम) आहे. ही एक स्वयंचलित सुरक्षा प्रणाली असून ही प्रणाली दोन गाड्यांची टक्कर होण्यापासून रोखते. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान भारतातच विकसित करण्यात आलं असून परदेशातून आयात होणाऱ्या ट्रेनच्या तुलनेत कमी खर्चात बनवलं जातं. वंदे भारत ट्रेनबद्दल महत्त्वाच्या गोष्टी:
अलीकडेच झाली होती यशस्वी चाचणी- केंद्र सरकारनं आपल्या 2022 च्या अर्थसंकल्पात ‘कवच’ तंत्रज्ञान अंतर्गत 2000 किमी रेल्वे नेटवर्क समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच या ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली. इतर आयात केलेल्या ट्रेनपेक्षा या ट्रेनची किंमत 50 टक्के कमी आहे. कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टम - स्वदेशात विकसित वंदे भारत ट्रेन सेमी-हाय स्पीड ट्रेन 0 ते 100 किमीचा वेग 52 सेकंदात पकडेल. ट्रेन स्लायडिंग फुटस्टेप्स, टच-फ्री स्लायडिंग दरवाजे आणि स्वयंचलित प्लग दरवाजे यांनी सुसज्ज आहेत. कोच कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टीम तापमान नियंत्रित करेल, ही ट्रेन नियंत्रण कक्ष आणि देखभाल कर्मचार्यांकडून नियंत्रित केली जाईल शिवाय संवाद आणि अभिप्राय यासाठी GSM आणि GPRS तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. हेही वाचा: Flying Car: जबराट! ’या’ फ्लाईंग कारची जगभरात चर्चा, 4 तासांपेक्षा जास्त वेळ करू शकता हवाई प्रवास या ट्रेनमध्ये टॉयलेट डिझाइनही खास असेल- ट्रेनमध्ये अपंगांसाठी विशेष शौचालये आहेत. इतर प्रवाशांसाठी टच-फ्री बायो-व्हॅक्यूम टॉयलेट स्थापित केली आहेत. त्याचप्रमाणे अंध प्रवाशांसाठी आसन क्रमांक देखील ब्रेलमध्ये डिझाइन केले आहेत. ट्रेनमध्ये लेव्हल-II सुरक्षा इंटिग्रेशन सर्टीफिकेट दिलं आहे, रियर-व्ह्यू कॅमेरा आणि 4 प्लॅटफॉर्म साइड कॅमेरे, एस्पिरेटिंग स्मोक डिटेक्टर आणि सप्रेशन सिस्टम, इलेक्ट्रिकल क्यूबिकल्स, एरोसोल-आधारित फायर डिटेक्शन आणि वॉशरूममध्ये सप्रेशन सिस्टम असेल.
30 सप्टेंबर रोजी अहमदाबाद मेट्रोचे उद्घाटन - आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ज्याचा शुभारंभ पंतप्रधान मोदी करणार आहेत. 30 सप्टेंबर रोजी अहमदाबाद मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनानंतर दोन दिवसांत मेट्रो सेवा सुरू होईल.