जगातील पहिली उडणारी बाईक लाँच 

जगातील पहिली उडणारी बाईक लाँच झाली आहे.

AERWINS Technologies या जपानी स्टार्टअप कंपनीनं ही बाईक बनवली आहे.

15 सप्टेंबर रोजी डेट्रॉईट ऑटो शोमध्ये तिला लाँच करण्यात आलं.

या शोदरम्यान तज्ञांनी या बाइकचं खूप कौतुक केलं.

Xturismo असं या बाईकचं नाव आहे.

कंपनीच्या मते या बाईकची किंमत 7 लाख 77 हजार डॉलर्स आहे.

या बाईकचं वजन 300 किलो आहे.

ही उडणारी बाईक ताशी 100 किलोमीटर वेगानं उड्डाण करू शकते.

तिला बॅटरीच्या माध्यमातून पावर दिली जाते.

ही बाईक जपानमध्ये काळ्या, निळ्या आणि लाल रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.