मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Flying Car: जबराट! ’या’ फ्लाईंग कारची जगभरात चर्चा, 4 तासांपेक्षा जास्त वेळ करू शकता हवाई प्रवास

Flying Car: जबराट! ’या’ फ्लाईंग कारची जगभरात चर्चा, 4 तासांपेक्षा जास्त वेळ करू शकता हवाई प्रवास

Flying Car: जबराट! ’या’ फ्लाईंग कारची जगभरात चर्चा, 4 तासांपेक्षा जास्त वेळ करू शकता हवाई प्रवास

Flying Car: जबराट! ’या’ फ्लाईंग कारची जगभरात चर्चा, 4 तासांपेक्षा जास्त वेळ करू शकता हवाई प्रवास

Klein Vision Flying Car: क्लेन व्हिजन नावाच्या कंपनीनं एअर कार बनवली आहे. या कंपनीने अशी कार बनवली आहे जी केवळ रस्त्यावर धावू शकत नाही तर हवेतही उडू शकते. गेल्या वर्षी या उडत्या कारनं स्लोव्हाकियाच्या दोन शहरांमधून उड्डाण केलं होतं.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 28 सप्टेंबर: आजपर्यंत आपण रस्त्यावर चालणाऱ्या कार पाहिल्या असतील, पण आता कार हवेतून उडताना दिसल्यास नवल वाटून घेऊ नका. कार उडू शकली असती तर काय झालं असतं याचा विचार सर्वांच्या मनात एकदा तरी आला असेल. मात्र क्लीन व्हिजन नावाच्या कंपनीनं हा विचार प्रत्यक्षात आणला आहे. या कंपनीनं अशी कार बनवली आहे, जी केवळ रस्त्यावर धावत नाही तर हवेतही उडू शकते. गेल्या वर्षी या उडत्या कारनं स्लोव्हाकियाच्या दोन शहरांमधून उड्डाण केलं होतं.

आज आम्ही तुम्हाला या उडत्या कारबद्दल सांगणार आहोत. चला तर मग ही फ्लाईंग कार कशी काम करते आणि तिची खासियत काय आहे तसेच या कारच्या इंजिनची काय खासियत आहे, या गोष्टींची माहिती घ्यावी.

फ्लाईंग कारची खासियत-

या फ्लाइंग कारमध्ये 160 अश्वशक्तीचे बीएमडब्ल्यू इंजिन बसवण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. एवढ्या क्षमतेचं इंजिन बसवण्यात येण्यामागचं कारण म्हणजे उड्डाण करताना आणि प्रवास करताना त्रास होऊ नये. या कारची एक खासियत म्हणजे यामध्ये कोणतेही विशेष इंधन किंवा पेट्रोल वापरलेलं नसून त्यामध्ये सामान्य पेट्रोल वापरलं आहे.

हेही वाचा:  काय सांगता! चक्क मोबाइलपेक्षाही लवकर चार्ज होते 'ही' कार, वाचा चकित करणाऱ्या गोष्टी

फ्लाईंग कारमध्ये कोणतं इंजिन आहे?

कारच्या इंजिनबद्दल बोलायचं झाल्यास, ही कार PAL_V लिबर्टी ड्युअल इंजिनद्वारे समर्थित आहे. ही कार रस्त्यावर 160 किलोमीटर वेगाने धावू शकते आणि 1000 फूट लांब धावपट्टीवर टेक ऑफ करू शकते. ही फ्लाईंग कार 11480 फूट उंचीपर्यंत उडू शकते. या कारमध्ये 100 लिटरची इंधन टाकी आहे आणि ती किमान 4.3 तास हवाई प्रवास करू शकते.

फ्लाईंग कारची किंमत-

फ्लाइंग कारची खासियत जाणून घेतल्यानंतर, आता तुम्ही विचार करत असाल की कारची किंमत काय आहे, तर आम्ही तुम्हाला सांगतो की या कारची सुरुवातीची किंमत 399,00 डॉलर्स आहे. याचा अर्थ अंदाजे या कारची किंमत 2.52 कोटी रुपये आहे.

First published:

Tags: Car