कॉन्टॅक्ट लिस्ट पाहण्यासाठी गुगलच्या होम पेजवर उजव्या बाजूला असलेल्या Gmail जवळील Contacts ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर स्क्रीनवर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर दिसतील. या सर्व नंबर्सचा बॅकअपही घेता येऊ शकतो. इथे कॉन्टॅक्ट नंबर डिलीट करण्याचाही ऑप्शन दिला जाईल.
नवी दिल्ली, 7 जून : सध्याच्या काळात प्रत्येक जण स्मार्टफोनचा वापर करतो. अनेकदा स्मार्टफोन युजर्सला फोन वापरताना काही समस्यांचा सामना करावा लागल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे दररोजच्या वापरातील या गोष्टीबाबत काही बाबी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. स्मार्टफोन वापरताना काही छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास, मोठ्या समस्यांपासून बचाव करता येऊ शकतो. App डाउनलोड - कोणतंही App डाउनलोड करण्यापूर्वी फोन कोणकोणत्या परमिशन मागतं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अनेकदा अॅपच्या टर्म्स अँड परमिशनची मोठी लिस्ट असते. बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष केलं जातं. परंतु या गोष्टी वाचणं गरजेचं आहे, कारण अनेकदा अनेक अॅप्स तुमच्या फोनची कॉन्टॅक्ट लिस्ट, मेसेज, स्टोरेजची परमिशन मागतात. मोबाईल चार्जिंग - मोबाईलच्या अधिक वापरामुळे अनेकांना सतत फोन चार्ज करावा लागतो. अशात बरेचसे लोक रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावून तसाच ठेवतात. परंतु असं करणं धोक्याचं ठरतं. रात्रभर मोबाईल चार्जिंग केल्याने ब्लास्ट होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे ज्यावेळी जागे असाल, तेव्हाच फोन चार्जिंगला लावून तो काढून टाका.
डुप्लिकेट चार्जर - नेहमीच त्याच चार्जरने फोन चार्ज करा, जे फोनसोबत दिलं असेल किंवा जे तुमच्या फोनचंच असेल. दुसऱ्या फोनचं चार्जर तुमचा फोन आणि बॅटरी दोन्ही खराब करू शकतं. एवढंच नाही, तर नकली चार्जरचा वापरही धोकादायक ठरू शकतो. जर फोनचं चार्जर खराब झालं असेल, तर ओरिजनल चार्जरचं खरेदी करा. लोकल बॅटरी - जर तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी खराब झाली असेल आणि तुम्ही लोकल बॅटरी वापरण्याचा विचार करत असाल, तर असं करू नका. लोकल क्वालिटीची बॅटरी वापरल्यानेही मोबाईलमध्ये ब्लास्ट होऊ शकतो. मोबाईल हिट - मोबाईल हिट किंवा गरम होत असल्यास, त्याचा वापर त्वरित थांबवा. यामुळे स्मार्टफोन नॉर्मल टेम्प्रेचरमध्ये येण्यास वेळ मिळेल.
सूर्यप्रकाश - स्मार्टफोन कधीही थेट सूर्यप्रकाशात ठेऊन चार्ज करू नका. यामुळे फोन ओव्हर हिट होतो, ज्यामुळे ब्लास्ट होण्याची शक्यता निर्माण होते. Bluetooth, Wifi - स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ, वायफाय, GPS चा वापर नेहमी होत असतो. परंतु याचा वापर झाल्यानंतरही ते बंद करणं राहून जातं. ज्यामुळे बॅटरी मोठ्या प्रमाणात संपते. तसंच यामुळे फोनच्या प्रोसेसरचंही काम वाढतं. त्यामुळे काम झाल्यानंतर हे बंद करणं गरजेचं आहे.