नवी दिल्ली, 30 जून : गुगल ड्राईव्हचा (Google Drive) वापर करताना युजर्सला सावध राहणं गरजेचं आहे. अन्यथा कंपनीच्या कठोर कारवाईचा सामना करावा लागू शकतो. याबाबत गुगलकडून (Google) माहिती देण्यात आली आहे. गुगल ड्राईव्हमध्ये युजर्स आपली सर्व पर्सनल माहिती स्टोर करतात. परंतु काही गोष्टी गुगल ड्राईव्हवर स्टोर करणं महागात पडू शकतो. असा गोष्टी सेव्ह करणं कंपनीच्या नियमांच्या विरोधात आहे. कंपनीने या प्रकरणी मालवेअर (Malware), कॉपीराईट (Copyright) आणि अश्लील सामग्रीच्या (Pornography) वितरण करण्यास मनाई करण्याचं धोरण स्पष्ट केलं आहे. या गोष्टी सेव्ह करू नका - बेकायदेशीर सॉफ्टवेअर लायसन्स, बेकायदेशी फिल्म किंवा गेम आणि अश्लील सामग्रीच्या प्रसाराबद्दल चिंतेत असलेल्या गुगलने याकडे अधिक गांभिर्याने लक्ष देत, युजर्सला याबाबत माहिती दिली आहे. या धोरणाविरोधात कोणतीही सामग्री आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा कंपनीने दिला आहे.
असं साहित्य इंटरनेटवरही जारी करण्यात आलं असून गुगल सर्चवरही हे टाकण्यात आलं आहे. गुगल ड्राईव्हचा वापर करणाऱ्या काही लोकांनी आपल्या वैयक्तिक अकाउंटमध्ये यासंबंधी काही लिंक सार्वजनिक केल्या आहेत.
मालवेअर, कॉपीराईट आणि अश्लील सामग्रीच्या वितरणास प्रतिबंध करण्यासाठी गुगल ड्राईव्हचं धोरण स्पष्ट असल्याचं गुगल प्रवक्तांनी म्हटलं आहे. तसंच या बाबी गंभीरपणे घेत असून ज्यावेळी अशा स्टोर बाबी आमच्या गैरवर्तन धोरणांच्या विरुद्ध आढळतील, तेव्हा आम्ही योग्य ती कारवाई करू असंही ते म्हणाले.