JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / सावधान! चुकूनही Credit Card ने करू नका या गोष्टींसाठी Payment, अन्यथा...

सावधान! चुकूनही Credit Card ने करू नका या गोष्टींसाठी Payment, अन्यथा...

क्रेडिट कार्डचा वापर अनेक जण करतात, पण यासंबंधीचे सर्वच नियम सर्वांनाच माहित नसतात. क्रेडिट कार्डचा वापर काही खास पेमेंटसाठी केला जाऊ शकत नाही. RBI ने क्रेडिट कार्डवरुन काही पेमेंट्स करण्यास बंदी आणली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 6 जुलै: भारतात डिजीटल व्यवहारात (Digital Transactions) मोठी वाढ झाली आहे. अनेक व्यवहार कॅशलेस (Cashless) झाल्याने आता क्रेडिट कार्डचाही मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. सध्या अधिकतर लोक शॉपिंग, प्रवास यासांरख्या कामांसाठी क्रेडिट कार्डचा वापर करतात. अकाउंटमध्ये पैसे नसल्याने कठीण काळात लोक क्रेडिट कार्डवर (Credit Card) लोनही घेतात. लोनची रक्कम अधिक नसल्यास, लोन सहजपणे मिळतं. क्रेडिट कार्डसंबंधी नियम - क्रेडिट कार्डचा वापर अनेक जण करतात, पण यासंबंधीचे सर्वच नियम सर्वांनाच माहित नसतात. क्रेडिट कार्डचा वापर काही खास पेमेंटसाठी केला जाऊ शकत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) क्रेडिट कार्डवरुन काही पेमेंट्स करण्यास बंदी आणली आहे.

(वाचा -  एका वेळी किती Credit Card असावेत?जाणून घ्या अधिक कार्ड्स असल्याचा फायदा की तोटा )

- फॉरेक्स ट्रेडिंग - लॉटरी तिकीट खरेदी - कॉल बॅक सर्विसेज

(वाचा -  तुमच्या हॉटेल रूममध्ये छुपा कॅमेरा तर नाही ना? ; या सोप्या ट्रिक वापरून तपासा )

- सट्टेबाजी - स्वीपस्टेक्स (घोडा रेसिंग) - जुगार - प्रतिबंधित मॅग्झिन्सची खरेदी, अशा ठिकाणी क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करता येत नाही.

(वाचा -  मोबाईल बँकिंग करताना बाळगा सावधगिरी,हॅकर्सकडून अनेक पद्धतींनी होतोय Online Fraud )

काय आहे नियम - विदेशी मुद्रा व्यवस्थापन कायदा 1999 आणि इतर लागू नियमांनुसार, वरील ठिकाणी खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर करण्यास मनाई आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या नियमांत नमूद केलं, की या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन झाल्यास कार्डधारक जबाबदार असेल तसंच कार्ड धारकाला कार्ड स्वत: जवळ ठेवण्यासाठी बंदी केली जाऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या