UPI - UPI च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फ्रॉड केल्याचं समोर आलं आहे. यूपीआयद्वारे फ्रॉड करणारे एखाद्या व्यक्तीला डेबिट लिंक पाठवतात आणि त्यावर समोरच्या व्यक्तीने क्लिक करुन आपला पीन टाकल्यानंतर त्याच्या खात्यातून पैसे कट होतात. अशाप्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी फोनवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
नोकरीच्या नावाने फसवणूक - नोकरीच्या नावाने खोट्या जाहिराती दिल्या जातात किंवा एक लिंक दिली जाते आणि त्यावर क्लिक केल्यानंतर नोकरीसंबंधी माहिती मिळेल, असं सांगितलं जातं. जॉब अलर्ट नावाने फी मागितली जाते. त्यामुळे नोकरीच्या नावाने किंवा एखाद्या पोर्टलवर नोकरी देत असल्याचं सांगत पेमेंट करायचं सांगितलं जातं, अशावेळी त्या पोर्टलची संपूर्ण माहिती घेणं अतिशय गरजेचं आहे.