पासवर्डसाठी किमान 10 ते 15 अक्षरांचा वापर करा. यात अक्षरांसह अंकांचाही समावेश असावा. तसंच स्पेशल कॅरॅक्टर्स @,#,%,&,* यांचा देखील वापर करावा.
नवी दिल्ली, 8 जून : कोणत्याही अकाउंटच्या सिक्योरिटीसाठी त्याचा Password स्ट्राँग आणि यूनिक असणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या अकाउंटसाठी सिक्योर पासवर्ड जनरेट करू शकत नसाल, तर यासाठी Google Chrome तुमची मदत करू शकतं. गुगल क्रोममध्ये पासवर्ड स्टोर आणि सिंक्रोनाईज करण्याच्या सुविधेसह, यात एक बिल्ट-इन पासवर्ड जनरेट फीचरही असतं. याचा उपयोग ऑनलाईन साईन-अप करण्यावेळी Strong Password बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. जाणून घ्या Google Chrome चा वापर करुन Secure Passwords कसा जनरेट कराल. Secure Passwords - Chrome चा पासवर्ड जनरेटर तुम्हाला प्रत्येक वेबसाईटसाठी मजबूत आणि यूनिक पासवर्डचा पर्याय सुचवतो. अकाउंट सिक्योर बनवण्यासह unauthorized access ही रोखतो. त्याशिवाय, इथे पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज लागत नाही, कराण हा पासवर्ड तुमच्या गुगल अकाउंटसह सिंक राहतो. आता Chrome वर हे फीचर डिफॉल्ट रुपात सुरू झालं आहे. याचा उपयोग तुम्ही ऑनलाईन अकाउंट बनवताना करू शकता.
- सर्वात आधी यासाठी तुम्हाला क्रोमवर सिंक फीचर इनेबर करावं लागेल. - आता कोणत्याही वेबसाईटवर जा आणि एक नवं अकाउंट क्रिएट करण्याचा प्रयत्न करा.
- जसं तुम्ही पासवर्ड बॉक्सवर (password box) टॅप करता, तसं क्रोम आपोआप एका स्ट्राँग पासवर्डचा पर्याय देतो. आता जनरेट केलेल्या पासवर्डचा उपयोग करण्यासाठी सजेशन बॉक्सवर क्लिक करा.