नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : iPhone 13 लाँच होऊन एक आठवडा झाला आहे. मागील आठवड्यापासून कंपनीने यासाठी प्री-ऑर्डर सुरू केली होती. 24 सप्टेंबरपासून iPhone 13 च्या सर्व वेरिएंट्सची विक्रीही सुरू होणार आहे. प्री-ऑर्डरवर अनेक रिटेलर्स अनेक कॅशबॅक ऑफर्स देत आहेत, परंतु Apple जी ऑफर देत आहे, ती या सर्व ऑफर्सहून फायदेशीर आहे. जर तुम्ही Apple च्या अधिकृत वेबसाइट किंवा स्टोरमधून iPhone 13 चं कोणतंही वेरिएंट खरेदी केलंत, तर तुम्हाला Apple-Trade-in द्वारे 46 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. अशी मिळेल सूट - iPhone 13 वर मोठी सूट मिळवण्यासाठी सर्वात आधी iPhone 13 मॉडेल Apple स्टोर किंवा वेबसाइटवरुन ऑर्डर करा. फोन बुक करताना Apple Offer Apple-Trade-in सिलेक्ट करा. इथे जुन्या मॉडेलच्या बदल्यात नवं मॉडेल खरेदी करता येईल. तसंच मोठी सूटही मिळेल.
काय आहे प्रक्रिया? Apple वेबसाइट किंवा स्टोरमध्ये ज्यावेळी नवा स्मार्टफोन iPhone 13 बुक कराल, त्यावेळी Apple-Trade-in ऑप्शनवर क्लिक करा. इथे कंपनी स्मार्टफोनबाबत काही प्रश्न विचारेल, त्याची उत्तर द्यावी लागतील. तुमच्या उत्तरांच्या आधारे Apple तुम्हाला अंदाजाने एक ट्रेड-इन व्हॅल्यू सांगेल आणि ही व्हॅल्यू खरेदीच्या वेळी इन्स्टंट क्रेडिट म्हणून लागू होईल. तुमची ऑर्डर प्लेस झाल्यानंतर तुम्हाला एक निश्चित तारीख आणि वेळ मिळेल आणि त्या वेळेत एक व्यक्ती तुम्हाला नवा फोन देऊन जुना फोन घेऊन जाईल. फोन डिलीव्हरीवेळी जुन्या स्मार्टफोनच्या काही टेस्ट केल्या जातील, तो चांगल्या स्थितीत आहे की नाही हे तपासलं जाईल. त्यानंतर ट्रेड-इन प्रक्रिया पूर्ण होईल आणि युजरला आपला नवा स्मार्टफोन दिला जाईल. जर तुमचा जुना फोन योग्यरित्या काम करत नसेल, आधी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरानुसार तुमच्या फोनची स्थिती आता मॅच करत नसेल, तर नवा iPhone मिळेल, परंतु जुन्या फोनची किंमत पुन्हा असेस केली जाईल आणि त्यानुसार सूट दिली जाईल. आधीचा डिस्काउंट आणि आताचा डिस्काउंट यामधील रक्कम तुम्हाला द्यावी लागेल.
या ट्रेड-इनमध्ये सूट तुमच्या जुन्या स्मार्टफोनवर आधारित आहे. अँड्रॉईड आणि आयफोनची वेगवेगळी यादी आहे आणि त्यानुसार त्यांची ट्रेड-इन व्हॅल्यू ठरवण्यात आली आहे.
तुमचा जुना स्मार्टफोन अँड्रॉईड असल्यास जवळपास 10 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते आणि जुन्या iPhone च्या बदल्यात नवा iPhone घेत असल्यास त्यावर 46 हजारांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो.