नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : सध्याच्या काळात क्वचितच असा एखादा व्यक्ती असेल ज्याच्याकडे स्मार्टफोन (smartphone) नसेल. धावपळीच्या या युगात 80 टक्के दैनंदिन काम हे स्मार्टफोनमुळं पार पडत आहे. जेवण ऑर्डर करण्यापासून तर औषधं मिळवण्यापर्यंत सर्व कामं ही केवळ एका क्लिकवर होत आहेत. त्यामुळं व्यक्तीचं (Always keep these apps in the smartphone)आयुष्य सुखकर होत आहे. त्यामुळं आता प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये अशा काही Apps असायलाच हव्या ज्यामुळं आपल्याला संकटकाळात तातडीनं काही तरी मदत होऊ शकते. जेवणासाठीच्या Apps अनेकदा आपल्याला आपल्या आवडत्या हॉटेलमधून जेवन मागवून खायला आवडतं. त्यामुळं थेट हॉटेलमध्ये न जाता घरबसल्या पेमेंट करून Zomato आणि Swiggy सारख्या प्रसिद्ध App मुळं आपल्याला जेवण मिळू शकते. त्याचबरोबर अनेकवेळा व्यक्ती हा प्रवासात असताना किंवा बाहेरच्या शहरांमध्ये या App वरून जेवन ऑर्डर करू शकतो.
ऑनलाईन शॉपिंग App हल्लीच्या काळात घरूनच शॉपिंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण ऑफलाईन (Amazon and Myntra in our smartphone) खरेदीपेक्षा Flipkart, Amazon, Myntra आणि Ajio सारख्या या App वर स्वस्तात आणि क्वालिटी असलेले कपडे ग्राहकांना खरेदी करता येतात. या App वरून आता ग्राहकांना सर्व इलेक्ट्रॉनिक्सचं सामान आणि किराणामाल ऑर्डर करता येतो.
ऑनलाईन पेमेंट करणं झालं सोपं वेळेनुसार सध्या मार्केट बदलत आहे. त्यातच आता Cashless economy मुळंही अनेकांना सहजरित्या ऑनलाईन पेमेंट करणं सोपं झालं आहे. त्यासाठी PhonePe, Paytm, Google Pay आणि BHIM UPI या प्लॅटफॉर्मवरीही पेमेंटची सुविधा देण्यात आलेली आहे. या App सुरक्षित आणि विश्वसनीयदेखील असल्यानं त्याचा वापर सध्याच्या काळात वाढत आहे.
प्रवासात असताना या App ठरतील फायदेशीर अनेकदा लोकांना काही कामानिमित्त बाहेर प्रवास करावा लागतो. त्यामुळं त्यांना Travel करण्यासाठी Ola आणि Uber सारख्या App तर प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये थांबण्यासाठी Make my Trip आणि Ease my Trip या App फायदेशीर ठरू शकतात. यावरून तुम्हाला Flights, बस, ट्रेन आणि कॅबही बुक करता येऊ शकतात.
मनोरंजनासाठी या App ठरतील फायदेशीर स्मार्टफोनच्या माध्यमातून व्यक्तीला मनोरंजन करण्यासाठी Netflix, Amazon Prime Video आणि Hotstar सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल तर सदाबहार गाणी ऐकण्यासाठी Spotify आणि Jio Saavn या App वापरता येऊ शकतात. त्यामुळं आता प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये या App असायला हव्या जेणेकरून व्यक्तीचं जीवन सुखकर होण्यास मदत होईल.