JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Two-step Verification नंतर Google आणणार आणखी एक Security Feature, कसा होईल फायदा

Two-step Verification नंतर Google आणणार आणखी एक Security Feature, कसा होईल फायदा

गुगल (Google) पुढील महिन्यापासून युजरला सेफ ब्राउझिंग फीचरचा (Safe Browsing) वापर करण्याचा पर्याय देणार आहे. यामुळे वेब आणि गुगल अकाउंटमध्ये येणाऱ्या थ्रेटपासून प्रोटेक्शन मिळेल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : देशासह जगभरात ऑनलाइन फ्रॉड (Online Fraud), सायबर क्राइमच्या (Cyber Crime) संख्येत मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या पद्धतींनी सायबर क्रिमिनल्स (Cyber Criminals) लोकांची फसवणूक करत आहेत. फ्रॉडची वाढती प्रकरण पाहता गुगलकडूनही (Google) युजर्सचे अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली जातात. गुगलने आपल्या युजर्सची अकाउंट सिक्योरिटी (Google Account Security) अधिक स्ट्राँग केली आहे. 2021 मध्ये टू-स्टेप वेरिफिकेशन (Two-Step Verification) फीचर सुरू करण्यात आलं होतं. ही गुगल अकाउंट वेरिफिकेशन प्रक्रिया सुरू केल्यानंतर अकाउंट हॅकिंग (Account Hacking) प्रकरणात 50 टक्क्यांची कमी आल्याचा दावा गुगलने केला आहे. मागील वर्षी जवळपास 150 मिलियनहून अधिक युजर्स टू-स्टेप वेरिफिकेशन प्रक्रियेशी जोडले गेले आहेत. यामुळे अकाउंट हॅकिंग प्रकरणात 50 टक्क्यांची कमी आल्याचं गुगलने म्हटलं आहे.

हे वाचा -  Fake-बनावट सॉफ्टवेअरने सेकंदात रिकामं होईल बँक अकाउंट, या गोष्टी लक्षात ठेवाच

गुगल सेफ ब्राउझिंग (Google Safe Browsing) - आपल्या युजर्सच्या सुरक्षेत अधिक वाढ करण्यासाठी कंपनी आणखी एक फीचर आणण्याच्या तयारीत आहे. आपल्या ब्लॉगमध्ये कंपनीने ही माहिती दिली आहे. ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गुगल (Google) पुढील महिन्यापासून युजरला सेफ ब्राउझिंग फीचरचा (Safe Browsing) वापर करण्याचा पर्याय देणार आहे. यामुळे वेब आणि गुगल अकाउंटमध्ये येणाऱ्या थ्रेटपासून प्रोटेक्शन मिळेल. हे फीचर भारतात कधी लाँच होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

हे वाचा -  नॅनोच्या नव्या EV मॉडेलचे Ratan Tata झाले फॅन, त्या खास मित्रासोबत घेतली राइड

Google वर आयडेंटिटी थेफ्ट कसं थांबवाल, हे सर्च 110 टक्क्यांनी वाढलं असल्याचं गुगलने म्हटलं आहे. लोक स्वत:ला ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यासाठीचे पर्याय गुगलवर सर्च करत असल्याचं गुगलने म्हटलं. या सर्च लिस्टवरुनच अनेक लोक अद्यापही गुगलवर ऑनलाइन सुरक्षिततेबाबत माहिती घेत असल्याचं समजलं आणि त्याच आधारावर युजर्सला अधिक ऑनलाइन सुरक्षा देण्यासाठी नवं फीचर आणणार असल्याचं Google ने म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या