मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Tata NANO EV: नॅनोच्या नव्या मॉडेलचे Ratan Tata झाले फॅन, त्या खास मित्रासोबत घेतली राइड

Tata NANO EV: नॅनोच्या नव्या मॉडेलचे Ratan Tata झाले फॅन, त्या खास मित्रासोबत घेतली राइड

पुणे स्थित कंपनी इलेक्ट्रा ईवीने (Electra EV) नॅनो कारचं इलेक्ट्रिक वेरिएंट तयार केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे टाटा सन्सचे अध्यक्ष आणि उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी या गाडीतून प्रवास केला आहे.

  नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : देशातील पॉप्युलर ऑटोमोबाइल कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) टाटा नॅनो (Tata NANO) लाँच केल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच चर्चा होती. त्यानंतर काही वर्षांनी कंपनीने याचं प्रोडक्शन बंद केलं. आता पुणे स्थित कंपनी इलेक्ट्रा ईवीने (Electra EV) नॅनो कारचं इलेक्ट्रिक वेरिएंट तयार केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे टाटा सन्सचे अध्यक्ष आणि उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी या गाडीतून प्रवास केला आहे. Electra EV ने लिंक्डइनवर रतन टाटा यांच्यासोबतच्या या खास क्षणाचा फोटो शेअर केला आहे. नॅनो ईवीजवळ रतन टाटा दिसत असून त्यांच्यासोबत त्यांचा सहकारी शांतनु नायडूही दिसतो आहे. 'रतन टाटा यांना ही कार केवळ पसंतच पडली नाही, तर त्यांनी या गाडीतून राइडचा आनंदही घेतला' असल्याचं इलेक्ट्रा ईवीने म्हटलं आहे. कंपनीने फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. 'ज्यावेळी आमचे फाउंडर कस्टम-बिल्ट नॅनो ईवीची राइड करतात, जी इलेक्ट्रा ईवीच्या पॉवरट्रेनवर तयार आहे. टीम इलेक्ट्रा EV साठी हा अतिशय Moment Of Truth क्षण आहे. आम्ही रतन टाटा यांची नॅनो ईवी डिलीव्हर करुन तसंच त्यांच्याकडून अमूल्य फीडबॅक मिळाल्याचा अतिशय अभिमान वाटत' असल्याचं कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. Tata Nano EV फीचर्स - Tata Nano EV 4 सीटर कार आहे. या कारची रेंज 160 किलोमीटरपर्यंत आहे. ही कार 10 सेकंदाहून कमी वेळेत झिरो ते 60 किलोमीटर ताशी स्पीड पकडते. या इलेक्ट्रिक कारमध्ये लिथियम आर्यन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. कोण आहे शांतनु नायडू - शांतनु रतन टाटा यांचे स्वीय सचिव आहेत. मुंबईत राहणाऱ्या शांतनु नायडूच्या (Shantanu Naidu) कामाने प्रभावित होऊन रतन टाटा यांनी स्वत: त्याला फोन करुन आपला असिस्टेंट होण्याबाबत विचारणा केली होती. रतन टाटा यांच्यासोबत काम करणाऱ्या शांतनुने आपली कहाणी फेसबुक पेज ह्युमन्स ऑफ बाँबेवर लिहिली होती. तेव्हापासून शांतनु चर्चेत आहे. 2014 मध्ये त्यांचं आयुष्यच बदललं असल्याचं म्हटलं जातं.

  हे वाचा - आता पूर्वीसारखे आकाशात तारे का दिसत नाही! काय आहे यामागचं कारण?

  जवळपास पाच वर्षांपूर्वी त्याने एका कुत्र्याचा रस्त्यावर अपघात झाल्याचं पाहिलं. त्यानंतर त्याने कुत्र्यांना अशाप्रकारे मरणापासून वाचवण्याचा निर्णय घेतला. यातूनच शांतनुला कुत्र्यांच्या गळ्यावर कॉलर बनवण्याची कल्पना सुचली. अशी चमकदार कॉलर ज्यामुळे वाहन चालकाला रस्त्यावर ती दूरवरुनही दिसू शकेल. या त्याच्या कल्पनेतून रतन टाटा प्रभावित झालो होतो.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Car, Ratan tata, Tata group

  पुढील बातम्या