नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर : PAN Card आणि Aadhaar Card प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. या कागदपत्रांशिवाय अनेक काम रखडली जातात. व्यक्ती जिवंत असताना याची गरज असते. पण कधी विचार केलाय का, की व्यक्तीच्या मृत्यूनंतर PAN आणि Aadhaar कार्डचं करायचं? व्यक्तीच्या मृत्यूनंतर PAN Card चं काय कराल? बँक अकाउंट, डिमॅट अकाउंट आणि इनकमटॅक्स रिटर्नसाठी पॅन कार्ड सर्वात गरजेचं आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे पॅन कार्डचे अधिकार असून चार वर्षानंतर असेसमेंट पुन्हा ओपन करायचं काही नाही हे अधिकारही त्यांच्याकडेच असतात. अशात मृत व्यक्तीचं टॅक्स रिफंड बाकी असल्यास ते रिफंड खात्यात आलं की नाही हे तपासणं आवश्यक असतं. यासंबंधी कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यास, मृत व्यक्तीचं पॅन आयकर विभागाकडे सोपवता येऊ शकतं. पॅन कार्ड सरेंडर करण्याआधी मृत व्यक्तीचे सर्व बँक अकाउंट दुसऱ्या व्यक्तीच्या नावे ट्रान्सफर करणं किंवा बंद करणं आवश्यक आहे.
PAN Card सरेंडर कसं कराल? पॅन कार्ड सरेंडर करण्यासाठी मृत व्यक्तीच्या प्रतिनिधीला किंवा त्याच्या कायदेशीर वारसाला अशा असेसमेंट ऑफिसरला एक अर्ज द्यावा लागतो, ज्याच्या अधिकार क्षेत्रात पॅन कार्ड रजिस्टर्ड आहे. अर्जात पॅन कार्ड सरेंडर करण्याचं कारण, नाव, पॅन नंबर, जन्मतिथी आणि डेथ सर्टिफिकेट कॉपी अटॅच करावी लागेल. मृत व्यक्तीचं पॅन कार्ड सरेंडर करणं अनिवार्य नाही. जर भविष्यात कधी या पॅन कार्डची दरज लागेल असं वाटत असल्यास ते तुमच्याकडे ठेवू शकता.
मृत्यूनंतर आधार कार्डचं काय करायचं? आधार कार्ड ओळखपत्र, अॅड्रेस प्रुफ असून अत्यावश्यक डॉक्युमेंट आहे. आधार कार्ड एक युनिक नंबर असतो, त्यामुळे मृत्यूनंतरही हा नंबर कायम राहतो. हा नंबर इतर कोणालाही देत येत नाही. मृत्यूनंतर नंबर डिअॅक्टिवेट करता येत नाही.