JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Final आधी मोठी अपडेट, 3 खेळाडूंचं पालटलं नशीब; टीम इंडियात संधी

WTC Final आधी मोठी अपडेट, 3 खेळाडूंचं पालटलं नशीब; टीम इंडियात संधी

WTC Final : टीम इंडियामध्ये मोठे बदल, कोण आहेत ते 3 लकी खेळाडू ज्यांनी मिळाली संधी

जाहिरात

टीम इंडिया

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना खेळवला जाणार आहे. 11 जूनपर्यंत हा सामना खेळवण्यात येईल. हा सामना इंग्लंडच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्याआधी तीन क्रिकेटपटूचं नशीब पालटलं आहे. आयपीएल सामन्यामध्ये टीम इंडियासाठीचे महत्त्वाचे खेळाडू जखमी झाले आहेत. तीन खेळाडू मैदानात कधी परतणार याबाबत अजून कोणतेही अपडेट समोर आले नाही. त्याच वेळी टीम इंडियात मोठे बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियात तीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तीन खेळाडूंचं नशीब पालटलं आहे. टीम इंडियाकडून आता 15 ऐवजी 18 जणांची टीम असणार आहे. तीन जास्तीचे खेळाडू स्टॅण्डबायसाठी असणार आहेत. जखमी केएल राहुलच्या जागी इशान किशनचा 15 सदस्यांच्या टीममध्ये समावेश करण्यात आला. त्याचबरोबर भारतीय निवड समितीने 3 स्टँडबाय खेळाडूंना इंग्लंडला पाठवण्याचा निर्णयही घेतला आहे.

जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यरबाबत बीसीसीआयने दिली गुड न्यूज! लवकरच करणार कमबॅक

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यासाठी 15 ऐवजी 18 खेळाडू इंग्लंडला जाणार आहेत. निवड समितीने ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि सूर्यकुमार यादव यांना तिघांची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड केली असून त्यांना इंग्लंडला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडियाचे 4 मॅच विनर WTC Final आधीच OUT, रोहित शर्माचं वाढलं टेन्शन

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी मुख्य संघातील कोणत्याही खेळाडूला दुखापत झाल्यास यापैकी कोणत्याही खेळाडूला खेळण्याची संधी मिळू शकते. सूर्यकुमार यादवने टीम इंडियाकडून आतापर्यंत एकच टेस्ट मॅच खेळली आहे. त्या सामन्यात त्याने केवळ 8 धावा केल्या होत्या. त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याला पुन्हा खेळण्याची संधी देण्यात आली नाही. मुकेश कुमार आणि ऋतुराज गायकवाडने टीम इंडियाकडून अजून एकही कसोटी सामना खेळला नाही. त्यामुळे या सामन्यात जर त्यांना संधी मिळाली तर कसोटीमध्ये त्यांचं पदार्पण असणार आहे. घरच्या मैदानावर दोघांनीही खूप चांगली कामगिरी केली आहे.

IPL 2023 : केएल राहुलच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट, लखनऊ सुपर जाएंट्सला धक्का

संबंधित बातम्या

टीम इंडिया रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, युवराज यादव जयदेव उनाडकट. स्टॅण्डबाय खेळाडू - ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि सूर्यकुमार यादव.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या