JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ : 8 ओव्हर्समध्ये पलटली बाजी, न्यूझीलंड विरूद्ध टीम इंडियाचं जोरदार कमबॅक!

IND vs NZ : 8 ओव्हर्समध्ये पलटली बाजी, न्यूझीलंड विरूद्ध टीम इंडियाचं जोरदार कमबॅक!

भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील (Women’s World Cup) महत्त्वाची मॅच हॅमिल्टनमध्ये सुरू आहे. या मॅचमध्ये टीम इंडियानं कमबॅक केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मार्च : भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील (Women’s World Cup) महत्त्वाची मॅच हॅमिल्टनमध्ये सुरू आहे. या मॅचमध्ये आक्रमक खेळ करणाऱ्या न्यूझीलंडच्या इनिंगला टीम इंडियानं शेवटच्या 8 ओव्हर्समध्ये ब्रेक लावला.  42 ओव्हर्समध्ये 4 आऊट 224 असा भक्कम करणाऱ्या न्यूझीलंडला टीम इंडियानं 50 ओव्हरमध्ये 9 आऊट 260 रनवर रोखली आहे. पहिल्या मॅचमध्ये दमदार अर्धशतक झळकावणाऱ्या पूजा वस्त्राकारनं (Pooja Vastrakar) या मॅचमध्ये बॉलिंगमध्ये कमाल केली. तिने 10 ओव्हर्समध्ये फक्त 34 रन देत 4 विकेट्स घेतल्या. पूजाच्या भेदक बॉलिंगमुळे 300 रनच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या न्यूझीलंडला 260 रनवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे टीम इंडियाला ही मॅच जिंकण्याची आता चांगली संधी आहे.

संबंधित बातम्या

पूजानं बॉलिंग प्रमाणे फिल्डिंगमध्येही दमदार कामगिरी केली. तिने मॅचच्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये भारताला मोठं यश मिळवून दिलं. न्यूझीलंडच्या इनिंगमधील तिसऱ्या ओव्हरमध्ये एक रन झटपट घेण्याचा सूजी बेट्सचा प्रयत्न फसला. पॉईंट्सला उभ्या असलेल्या पूजानं डायरेक्ट थ्रो करत सूजीला रन आऊट केले. त्यानंतर पूजानं न्यूझीलंडची कॅप्टन सोफी डिव्हाईनची महत्त्वाची विकेट टीम इंडियाला मिळवून दिली. सोफीनं या स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये न्यूझीलंड विरूद्ध शतक झळकावले होते. IPL 2022 : गुजरातच्या टीममध्ये नवा खेळाडू दाखल, हार्दिकचा होणार डबल फायदा न्यूझीलंडकडून एमी सदरवेटनं सर्वाधिक 75 रन केले. तर भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरणाऱ्या अमेलिया करनं 50 रनची खेळी केली. भारताकडून पूजानं 4, राजेश्वरी गायकडवाडनं 2 तर झुलन गोस्वामी आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी एक विकेट घेतली. टीम इंडियाची अनुभवी बॉलर झूलन गोस्वामीनं यावेळी वन-डे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या