पाकिस्तान फॅन
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपची सेमीफायनल मॅच सिडनी क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी खेळली गेली. या मॅचमध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडचा 7 विकेट्स राखून पराभव केला आणि फायनल गाठली. फायनलमध्ये त्यांचा सामना इंग्लंडशी होणार आहे. इंग्लंडने दुसऱ्या सेमीफायनल मॅचमध्ये भारताचा 10 विकेट्सने पराभव करून फायनलमध्ये जागा पक्की केली. सिडनी ग्राउंडवर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याची जेवढी चर्चा झाली, त्यापेक्षा जास्त चर्चा एका तरुणीची झाली. त्या स्टेडियममध्ये पाकिस्तानचा जयजयकार करणारी एक सुंदर मुलगी मॅचनंतर चर्चेत आली. मात्र ही मुलगी कोण आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही. बुधवारी सेमीफायनल मॅच सुरू असताना स्टेडियममध्ये उपस्थित असलेली एक मुलगी पाकिस्तानला चिअर करताना दिसली. पॅव्हेलियनमधूनच ती मुलगी कधी फ्लाइंग किस देत होती तर कधी पाकिस्तानचा झेंडा फडकवत होती. काही वेळा हात हलवून पाकिस्तानी टीम आणि खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसली. ही मुलगी इतक्या वेळा कॅमेऱ्यात दिसली की सोशल मीडियावर लोक प्रश्न विचारू लागले की ती मुलगी नेमकी कोण आहे? दरम्यान, या स्पर्धेत फायनलमध्ये पाकिस्तानचा सामना भारताशी होईल, अशी आशाही या मुलीला होती.
पाकिस्तानच्या टीमची सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडशी मॅच झाली होती. या मॅचमध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत करून फायनल गाठली. या मॅचमध्ये पाकिस्तान संघाचा व खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. खेळाडूंना चिअर करण्यासाठी एका पाकिस्तानी चाहतीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर ती कोण आहे, तिचं नाव काय, याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. हेही वाचा - Eng vs Pak: फायनलमध्ये पाकिस्तान हरणार! इंग्लंडसाठी ठरली ‘ही’ गुड न्यूज… पाहा काय आहे प्रकरण सोशल मीडियावर तिचा फोटो, सेल्फी तुफान व्हायरल होत आहेत. अनेक क्रिकेटप्रेमी या तरुणीची इच्छा होती, म्हणून तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल मॅच व्हायला हवी होती, असं म्हणत आहेत. तर, काही जण ही मुलगी इंग्लंड आणि पाकिस्तानच्या फायनल मॅचमध्ये यायला हवी, असं म्हणत आहेत. दरम्यान, या मुलीबद्दल जास्त माहिती अद्याप समोर आली नसली तरी रिपोर्ट्स आणि तिच्या सोशल मीडिया पोस्ट्सनुसार, पाकिस्तानी क्रिकेट टीमच्या ‘जबरा फॅन’ मुलीचे नाव नताशा आहे. ती मूळची पाकिस्तानी आहे. पण तिचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला आणि तिथेच ती मोठी झाली. नताशा सध्या मेलबर्नमध्ये राहते.