JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाचं ठिकाण ठरलं; इथे घेणार सात फेरे

अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाचं ठिकाण ठरलं; इथे घेणार सात फेरे

बॉलिवूड आणि क्रिकेट यांच्यामधील घनिष्ठ नातं कायमच लोकांना भुरळ पाडत आलेलं आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्स लग्नबंधनातही अडकले आहेत.

जाहिरात

athiya shetty ans kl rahul

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 सप्टेंबर: बॉलिवूड आणि क्रिकेट यांच्यामधील घनिष्ठ नातं कायमच लोकांना भुरळ पाडत आलेलं आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्स लग्नबंधनातही अडकले आहेत. या जोड्यांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेमही मिळालं आहे. यातीलच एक पॉवल कपल म्हणून ओळखलं जाणारं जोडपं म्हणजे क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा. यांचे करोडो चाहते आहेत. या दोघांप्रेमाणे आता आणखी एका कपलची जोरदार चर्चा रंगताना दिसते. हे लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल. दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. याविषयी आता महत्त्वाची माहिती समोर आलीये. अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पिंकविलाच्या एका रिपोर्टनुसार, ‘अथिया शेट्टी आणि केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अहवालात असेही म्हटले आहे की अथिया आणि राहुलने मुंबईतील 5-स्टार हॉटेलऐवजी खंडाळा येथील सुनील शेट्टीचा ‘जहाँ’ हा बंगला त्यांच्या लग्नाचे ठिकाण म्हणून निवडला आहे’. हेही वाचा -  Sushmita Sen and Lalit Modi : सुष्मिता सेन आणि ललित मोदींचा ब्रेक-अप? यामुळे होतेय चर्चा केएल राहुल सध्या त्याच्या कामात व्यग्र असल्यामुळे त्याच्या वेळेनुसार लग्नाची तारीख ठरवली जाणार आहे. त्यामुळे अथिया आणि केएल राहुल दोघांचेही चाहते त्यांच्या लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर उत्साही आहेत. त्यामुळे आता दोघे लग्नाची घोषणा अधिकृतरित्या करणार की गुपचूप लग्न उरकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, गेल्या बऱ्याच दिवसांपासून अथिया आणि केएल राहुल एकमेकांना डेट करत आहे. अनेकदा दोघांना सोबत स्पॉट केलं आहे. दोघांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एकमेकांच्या पोस्टवर कमेंटही करतात. त्यामुळे त्यांच्या नात्यावर कधीच शिक्कामोर्तब झाला आहे. आता दोघांच्या लग्नासाठी सगळ्यांची उत्सुकता वाढली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या