virat kohli
मुंबई, 28 एप्रिल: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली(Virat Kohli) गेल्या 2 वर्षांपासून खराब फॉर्ममधून जात आहे. सध्याच्या त्याच्या अपयशी खेळीवर अनेक दिग्गज आपापल्या दृष्टिने मत व्यक्त करत आहेत. खरतंर स्वतः विराटदेखील हताश झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याची संत खेळी पाहून त्याचे गुरु रवि शास्त्री यांनी थेट त्याला ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे. तर आता माजी क्रिकेटर युवराज सिंग (Yuvraj Singh) यानेही विराटला खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी सल्ला दिला आहे. आयपीएल 2022 मधील (IPL 2022) मागील 5 डावांमध्ये विराटने (Virat Kohli) 9, 0, 0, 12 आणि 1 अशा धावा केल्या आहेत. सध्या विराट खराब फार्मशी झगडत आहे. तरीही, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी विराटला पुढील सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करण्यासाठी समर्थन दिले आहे. मात्र विराटला चांगल्या फॉर्ममध्ये परत येण्यासाठी काय करावे लागेल? असा प्रश्न युवराजला विचारला असता त्याने विशेष सल्ला दिला आहे. गुजरात विरुद्ध हैदराबाद मॅच पाहण्यासाठी पोहचली, Splitsvilla स्टार, व्हायरल होतायत PHOTO ‘होम ऑफ हिरोज’ या कार्यक्रमात युवराजने विराटविषयी भाष्य केले. तो म्हणाला, विराटला पुन्हा एकदा एक स्वतंत्र्य व्यक्तिमत्व बनण्याची गरज आहे. जर तो स्वतला बदलू शकतो. जसा तो यापूर्वी होता, हे त्याच्या खेळातूनही दिसून येईल. विराटने स्वत:ला या युगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून सिद्ध केले आहे. वर्तमानात विराटसोहत जे काही घडत आहे, ते जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंसोबतही घडते. साहजिक आहे की, तो स्वतदेखील आपल्या खराब फॉर्मवर खुश नाहीय आणि लोकही यामुळे हताश आहेत. कारण आपण त्याला खणखणीत शतके करताना पाहिलेय. पण सर्वश्रेष्ठ खेळाडूंसोबत असे होत राहाते,” असेही युवराजने म्हटले आहे. युवराजव्यतिरिक्त रवी शास्त्रींनीही विराटला सल्ला दिला आहे. विराटसाठी विश्रांती घेणे त्याच्यासाठी उत्तम असेल. कारण त्याने विश्रांती न घेता विक्रेट खेळले आहे. त्याने सर्व प्रकारांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्यासाठी विश्रांती घेणे शहाणपणाचे ठरेल. तुम्हाला माहिती आहे की, कधी कधी संतुलन बनवावे लागते. तुम्हाला तुमची आंतरराष्ट्रीय कारकीर्द मोठी बनवायची असेल आणि पुढचे 6-7 वर्ष स्वतःची छाप सोडायची असेल, तर आयपीएमधून माघार घ्यावी. असं शास्त्री यांनी विराटला सल्ला दिला आहे.