JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / रन मशीननं सचिन, पॉन्टिंगलाही टाकलं मागे! श्रीलंका विरुद्ध विराट कोहलीचं दमदार शतक

रन मशीननं सचिन, पॉन्टिंगलाही टाकलं मागे! श्रीलंका विरुद्ध विराट कोहलीचं दमदार शतक

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने श्रीलंके विरुद्ध दमदार नाबाद शतक ठोकल आहे. विराट कोहलीने या शतकासह मायदेशात सर्वाधिक शतकं करण्याच्या सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने श्रीलंके विरुद्ध दमदार नाबाद शतक ठोकल आहे. या शतकासह विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विकी पॉन्टिंग यांनाही मागे टाकले आहे.  भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना आसामच्या गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर खेळवला जात आहे. विस्फोटक फलंदाज विराट कोहलीचे हे 73 वे शतक असून केवळ 80 चेंडूत त्याने शतक पूर्ण केले आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका त्यांमध्ये सुरु असलेल्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम सलामीच्या फलंदाजीसाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात आले. यात शुभमन गिल 60 चेंडूत 70 धावा करून तर रोहित शर्मा 67 चेंडूत 83 धावा करून माघारी परतला. शुभमन गिल बाद झाल्यानंतर आलेल्या विराट कोहलीने संघाची कमान सांभाळली आणि सुरुवातीपासूनच उत्तम खेळी केली.  विराट कोहलीने या शतकासह आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याचे 73 वे तर वन डे क्रिकेट मधील 45 व्या शतकाचा टप्पा गाठला आहे. विराट कोहलीने 80 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने शतक पूर्ण केलं. हे ही वाचा : रणजी सामन्यात पृथ्वी शॉ ने ठोकले दुहेरी शतक; टीम इंडियात मिळणार का संधी? विराट कोहलीने या शतकासह मायदेशात सर्वाधिक शतकं करण्याच्या सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याने मायदेशात 160 सामन्यांमध्ये  20 वेळा शतक ठोकले होते. तर विराट कोहलीने मायदेशात खेळलेल्या केवळ 99 सामन्यात 20वेळा शतक ठोकण्याचा पराक्रम केलं आहे. याआधी विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा खेळाडू रिकी पॉन्टिंग याचा ही मायदेशातील 151 सामन्यात 14 वेळा शतक ठोकण्याचा विक्रम केला होता. विराट कोहलीने आतापर्यंत वनडे सामन्यात श्रीलंका विरुद्ध तब्बल 9 वेळा शतक केले आहे. विराटच्या शतकानंतर त्याच्यावर सध्या सर्वस्थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या