JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Virat Kohli: मुंबईच्या रस्त्यावर विराट-अनुष्काची चक्क स्कूटरवरुन सैर... व्हिडीओ व्हायरल

Virat Kohli: मुंबईच्या रस्त्यावर विराट-अनुष्काची चक्क स्कूटरवरुन सैर... व्हिडीओ व्हायरल

Virat Kohli: लवकरच आशिया चषकासाठी विराट भारतीय संघासोबत यूएईला (UAE) रवाना होईल. मात्र त्याआधी आज विराटनं पत्नी अनुष्कासह चक्क स्कूटरवरुन मुंबईच्या रस्त्यांवरुन सैर केली. सोशल मीडियात विराट अनुष्कासह फिरतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि एकच चर्चा रंगली.

जाहिरात

विराट आणि अनुष्काची स्कूटर राईड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 ऑगस्ट**:** टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या व्हेकेशन मोडवर आहे. पण लवकरच आशिया चषकासाठी विराट भारतीय संघासोबत यूएईला (UAE) रवाना होईल. मात्र त्याआधी आज विराटनं पत्नी अनुष्कासह चक्क स्कूटरवरुन मुंबईच्या रस्त्यांवरुन सैर केली. सोशल मीडियात विराट अनुष्कासह फिरतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि एकच चर्चा रंगली. सुरक्षा नियमांचं पालन करत सैर हा व्हिडीओ मुंबईच्या मड आयलँड भागातील आहे. एका शूटिंग प्रोजक्टसाठी विराट आणि अनुष्का तिथे आले होते. पण त्यानंतर त्यांनी स्कूटर राईडचा आनंद लुटला. दरम्यान या स्कूटर राईडवेळी दोघांनीही सुरक्षा नियमांचं पालन केलेनं दिसलं. दोघांनीही हेल्मेट घातलं होतं. तरीदेखील अनेकांनी त्यांना ओळखलंच.

संबंधित बातम्या

आशिया चषकात विराट मॅजिक**?** टीम इंडियाच्या या माजी कर्णधारानं इंग्लंड दौऱ्यानंतर विश्रांती घेतली होती. पण आशिया चषकाच्या तयारीसाठी विराटनं चांगलीच कंबर कसली आहे. मुंबईतल्या बीकेसीतील शरद पवार क्रिकेट अकादमीत विराट संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली फलंदाजीचा सराव करतोय. याच दरम्यान विराट फिटनेसवरही जोर देतोय. गेल्या काही वर्षात विराटच्या बॅटमधून धावांचा ओघ कमी झालाय. प्रत्येक मालिकेत विराटची त्याच्या फॉर्मशी झुंज सुरु आहे. इंग्लंड दौऱ्यातही विराटला आपल्या फलंदाजीतली जादू दाखवता आली नाही. पण आगामी आशिया चषकात तो पुन्हा फॉर्मात येईल अशी अपेक्षा क्रिकेटरसिक करतायत. कारण आशिया चषकात विराटनं आतापर्यंत दमदार कामगिरी बजावली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या