उन्मुक्त चंद धोनी आणि विराटसह
मुंबई, 1 ऑक्टोबर: उन्मुक्त चंद हे नाव भारतीय क्रिकेटला नवं नाही. हे नाव भारतीय क्रिकेटच्या रेकॉर्ड बुकमध्ये नोंद आहे. उन्मुक्त चंदच्या नेतृत्वात भारतानं 2012 साली अंडर नाईन्टिन वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आयपीएल आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्येही खेळण्याची मोठी संधी मिळाली. पण दिल्ली क्रिकेट असोसिएशनशी झालेला वाद, दुसऱ्या स्टेटकडून खेळण्याचा निर्णय, ढासळलेली कामगिरी अशा अनेक कारणांमुळे उन्मुक्त चंदला भारतापासून फारकत घ्यावी लागली. आणि आता तर तो अमेरिकेकडून क्रिकेट खेळतोय. पण याचदरम्यान उन्मुक्त चंदला एक मोठी दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. त्यानं सोशल मीडियात पोस्ट करुन या दुखापतीची माहिती दिली आहे. उन्मुक्त चंदला मोठी दुखापत सोशल मीडियात पोस्ट करत उन्मुक्त चंदनं म्हटलंय… ‘खेळाडूसाठी प्रत्येक दिवस सोपा नसतो… कधी तुम्ही जिंकून घरी येता तर कधी निराश होऊन. कधी तरी तुम्हाला दुखापतही होते. मी देवाचे आभार मानतो की त्यानं मला मोठ्या संकटातून वाचवलं. व्यवस्थित खेळा, सुरक्षित राहा.’ उन्मुक्त चंदला खेळताना ही मोठी दुखापत झाली आहे. ज्यात त्याचा डावा डोळा सुजलेला दिसतोय.
हेही वाचा - Irani Trophy 2022: इंग्लंडमध्ये हीरो पण घरच्या मैदानावर फेल, भारताचा टेस्ट स्पेशालिस्ट स्वस्तात आऊट टी20त शतकवीर उन्मुक्त चंद उन्मुक्त चंदनं आतापर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 67 मॅचमध्ये 32 च्या सरासरीनं 3379 रन्स केले आहेत. त्यात 8 शतक आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. तर लिस्ट ए क्रिकेटमध्येही 120 मॅचमध्ये 4505 धावा त्याच्या खात्यात जमा आहेत. तर टी20 क्रिकेटमध्ये त्यानं 79 मॅचमध्ये 1600 रन्स केले असून त्यात 3 शतकंही आहेत. सध्या उन्मुक्त चंद अमेरिकेत स्थायिक झाला असून तिथल्या मेजर क्रिकेच स्पर्धांमध्ये तो खेळत आहे.