JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : KKR च्या Umesh Yadav समोर पंजाबची हवा टाईट, केली सर्वोत्तम कामगिरी

IPL 2022 : KKR च्या Umesh Yadav समोर पंजाबची हवा टाईट, केली सर्वोत्तम कामगिरी

आयपीएलच्या 15 व्या सीझनमधील (IPL 2022) आठवा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब (KKRvPBKS) या संघांमध्ये खेळला गेला. या मॅचमध्ये पहिल्या सामन्यापासून फॉर्ममध्ये असलेल्य केकेआरचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) याने या सामन्यात पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 एप्रिल: आयपीएलच्या 15 व्या सीझनमधील (IPL 2022) आठवा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब (KKRvPBKS) या संघांमध्ये खेळला गेला. या मॅचमध्ये पहिल्या सामन्यापासून फॉर्ममध्ये असलेल्य केकेआरचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) याने या सामन्यात पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी केली. केकेआरने टॉस जिंकल्यानंतर घेतलेला बॉलिंगचा निर्णय उमेश यादवने सार्थ ठरवला. उमेश यादवने या सामन्यात चार षटके गोलंदाजी करताना 23 धावा देत चार विकेट‌ मिळवल्या. ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी त्याने 2012 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध 24 धावा देऊन चार बळी घेतले होते. उमेश या आयपीएलमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसून आला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पहिल्या सामन्यात 20 धावा देत 2 बळी टिपलेले. त्यानंतर आरसीबी विरुद्ध दोन बळी मिळवताना केवळ 16 धावा खर्च केल्या होत्या. केकेआरने टॉस जिंकल्यानंतर घेतलेला बॉलिंगचा निर्णय उमेश यादवने सार्थ ठरवला. पंजाबच्या डावातील पहिल्या हे ही वाचा- CSK vs LSG मॅचनंतर समोरासमोर आले धोनी-गंभीर अन्…, VIRAL होतोय हा VIDEO षटकाच्या शेवटच्या चेंडूवर उमेशने विरोधी संघाचा कर्णधार मयांक अग्रवालला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर शिखर धवन आणि भानुका राजपक्षे यांनी स्फोटक फलंदाजी करत 41 धावांची भागीदारी केली. पण यानंतर पंजाबने पुढील 41 धावांच्या 49 धावांत 4 विकेट गमावल्या. कागिसो रबाडा आणि ओडियन स्मिथच्या भागीदारीमुळे पीबीकेएसने 137 धावा केल्या. पण यादरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सच्या उमेश यादवने 4 षटकात केवळ 23 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. पंजाबचा संपूर्ण संघ अवघ्या 137 धावांवर सर्वबाद झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या