JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Kho Kho League: अल्टिमेट खो खो लीगचं दिमाखात उद्घाटन; गुजरात जायंट्स, तेलुगू योद्धाची विजयी सलामी

Kho Kho League: अल्टिमेट खो खो लीगचं दिमाखात उद्घाटन; गुजरात जायंट्स, तेलुगू योद्धाची विजयी सलामी

Kho Kho League: पुण्याच्या बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात अल्टिमेट खो खो लीगच्या पहिल्या पर्वाचं आज दिमाखात उद्घाटन झालं. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी गुजरात जायंट्स आणि तेलुगू योद्धा या संघांनी आपापपले सामने जिंकून विजयी सलामी दिली.

जाहिरात

चेन्नई वि. तेलुगू योद्धा सामना

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बालेवाडी-पुणे, 14 ऑगस्ट**:** मराठी मातीतल्या पारंपरिक खेळाला ग्लॅमर मिळावं आणि देशातल्या तळागाळातील खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावं या उद्देशानं पहिल्यावहिल्या अल्टिमेट खो खो लीगची संकल्पना पुढे आली. आणि पुण्याच्या बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात याच अल्टिमेट खो खो (Ultimate Kho Kho) लीगच्या पहिल्या पर्वाचं आज दिमाखात उद्घाटन झालं. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, अल्टिमेट खो खो लीगचे कार्यकारी प्रमुख तेनझिंग नियोगी, अखिल भारतीय खो खो फेडरेशनचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांच्या उपस्थितीत हा उद्घाटनाचा सोहळा पार पडला.

मुंबईची हार**;** गुजरात, तेलुगू योद्धाची विजयी सलामी स्पर्धेचा सलामीचा सामना पार पडला तो मुंबई खिलाडीज आणि गुजरात जायंट्स संघात. अल्टिमेट खो खो लीगच्या या पहिल्याच सामन्यात गुजरातनं मुंबईचा 69-44 अशा फरकानं पराभव करुन विजयी सलामी दिली. या सामन्यात दुसऱ्या डावाअखेर मुंबईचा संघ 44-30 अशा फरकानं आघाडीवर होता. पण अखेरच्या दोन डावात मुंबईला ही आघाडी टिकवता आली नाही. याच निर्णायक क्षणी गुजरातनं तब्बल 39 गुणांची कमाई केली. त्यामुळे मुंबईला 25 गुणांच्या फरकानं पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यात तेलुगू योद्धा संघानं चेन्नईचा पराभव करत विजयी सुरुवात केली. तेलुगू योद्धानं हा सामना 48-38 असा जिंकला.

अल्टिमेट खो खो लीगचं स्वरुप अल्टिमेट खो खो लीगमध्ये सहा फ्रँचायझींनी आपापले संघ मैदानात उतरवले आहेत. मुंबई खिलाडीज चेन्नई क्विक गन्स गुजरात जायंट्स ओडिशा जगरनॉट्स, राजस्थान वॉरियर्स तेलुगू योद्धा या सहा संघांमध्ये खो खोची ही अल्टिमेट स्पर्धा रंगणार आहे. आजपासून सुरु झालेली ही स्पर्धा 4 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. सोनी स्पोर्ट्स वाहिनीवर याचं थेट प्रक्षेपणही करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या