अफगाणिस्तान टीमचं नवं घर
दुबई, 27 नोव्हेंबर: गेल्या काही वर्षात अफगाणिस्ताननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला चांगलाच दबदबा राखला आहे. पण महत्वाची बाब अशी की अफगाणिस्तानमधल्या राजकीय वातावरणामुळे आणि तालिबानी राजवटीमुळे तिथलं क्रिकेट अस्थिर झालं आहे. त्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडे स्वत:चं होम ग्राऊंड म्हणून इतर देशांकडे मदत मागण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. गेली काही वर्ष भारत हे अफगाणिस्तानचं होम ग्राऊंड होतं. धर्मशाला आणि लखनौ इथं अफगाणिस्तानचे सामने व्हायचे. पण आता पुढच्या पाच वर्षासाठी अफगाणिस्तानसाठी या देशात सामने आयोजित करता येणार आहेत. यूएई अफगाणिस्तानसाठी होम ग्राऊंड एमिरेट्स क्रिकेट बोर्डानं पुढच्या पाच वर्षांसाठी अफगाणिस्तानला होम ग्राऊंड म्हणून यूएईत सामने खेळण्याची परवानगी दिली आहे. 2021 साली तालिबाननं अफगाणिस्तानवर झेंडा रोवल्यानंतर भारतासोबतचा अफगाणिस्तानचा करार संपुष्टात आला होता. त्यामुळे अफगाणिस्तान होम ग्राऊंडसाठी शोधात होता. पण आता एमिरेट्स क्रिकेट बोर्डानं पाच वर्षांसाठी एसीबीशी करार केला आहे. झालेल्या कराराची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून एसीबीनं केली आहे.
हेही वाचा - Ind vs NZ ODI: न्यूझीलंड 1, भारत 1, पाऊस 2… भारत-न्यूझीलंड मालिकेत पावसानं केला ‘हा’ रेकॉर्ड यूएईत क्रिकेट वाढतंय गेल्या काही वर्षात यूएईत मोठ्या प्रमाणात क्रिकेट सामने आयोजित केले जात आहेत. टी20 वर्ल्ड कप त्याचबरोबर आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धांचं यशस्वी आयोजन यूएईत पार पडलं. काही वर्षांपूर्वी यूएई हे पाकिस्तानसाठी होम ग्राऊंड होतं. पण आता पाकिस्तानात सामन्यांचं आयोजन होत असल्यानं अफगाणिस्तानसाठी यूएई होम ग्राऊंड बनलं आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या टी20 वर्ल्ड कपआधी अफगाणिस्ताननं यूएईतच पूर्वतयारी केली होती. इथूनच अफगाणिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता.