मुंबई, 31 मार्च: सध्या आयपीएलचा (IPL 2022) फिव्हर सर्वत्र पाहायला मिळत आहे. अशातच अनेक घडामोडी घडताना दिसत असतात. आयपीएलमध्ये खेळण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, पण एक खेळाडू असा आहे. जो आयपीएलचा प्रमुख असूनही त्यातून बाहेर पडला आहे. आयपीएल मेगा लिलावात या खेळाडूला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. अशा परिस्थितीत हा स्टार खेळाडू आयपीएलच्या मध्यावर निवृत्तीची घोषणा करू शकतो. असा तर्क सध्या क्रिकेट जगतात लावण्यात येत आहे. मिस्टर आयपीएल लवकरच करु शकतो निवृत्तीची घोषणा मिस्टर आयपीएल या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनाला सीएसके संघाने कायम ठेवले नाही. त्यानंतर मेगा लिलावात रैनाला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. आता सुरेश रैना कॉमेंट्री करत असून त्याच्या आयपीएलमध्ये पुनरागमन होण्याची शक्यताही कमी आहे. तो अतिशय खराब फॉर्मशी झुंज देत आहे. त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीत. अशा परिस्थितीत तो लवकरच निवृत्तीची घोषणा करू शकतो. महेंद्रसिंग धोनीच्या खास खेळाडूंमध्ये सुरेश रैनाची गणना होते. या दोन्ही खेळाडूंची उत्तम जुगलबंदी मैदानावर नेहमीच पाहायला मिळाली. वाचा- निवृत्तीच्या वयात IPL चे सामने जिंकणाऱ्या ‘या’ खेळाडूच्या करिअरला MS धोनीमुळे लागला होता ब्रेक CSK टीमनेही फिरवले तोंड सुरेश रैना मैदानात तत्पर आहे. तो जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. वैयक्तिक कारणांमुळे तो आयपीएल 2020 मध्ये खेळू शकला नाही. त्याचप्रमाणे, 2021 च्या हंगामात, त्याची बॅट शांत राहिली आणि तो धावा करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. यादरम्यान त्याने केवळ 160 धावा केल्या. गेल्या मोसमाच्या अंतिम फेरीत महेंद्रसिंग धोनीने त्याला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नाही. त्याच्या वयाचा परिणाम त्याच्यावर दिसू लागला आहे. अशा परिस्थितीत आता ‘मिस्टर आयपीएल’ पुन्हा आयपीएलमध्ये खेळताना दिसला नाही. वाचा- IPL 2022, LSG vs CSK : चेन्नईच्या टीममध्ये होणार मोठा बदल, वाचा Moeen Ali साठी कुणाला काढणार बाहेर? रैना महान फलंदाज आहे सुरेश रैना हा खूप चांगला फलंदाज आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने सीएसकेसाठी खूप धावा केल्या आहेत. मधल्या फळीत सुरेश रैनाचा पाया भक्कम होता. सुरेश रैना चेन्नई सुपर किंगशी 2008 पासून संबंधित होते. त्याने सीएसकेसाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले. तो नेहमीच मोठ्या खेळीसाठी ओळखला जातो. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 205 सामन्यात 5528 धावा केल्या आहेत. आणि त्याच्या पुढे फक्त विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा आहेत. सुरेश रैना याला त्याचे चाहते प्रेमाने मिस्टर आयपीएल म्हणतात. सुरेश रैना अखेरचा भारतीय जर्सीमध्ये जुलै 2018 मध्ये इंग्लंड मालिकेत खेळला होता. त्याने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने भारतासाठी 226 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5615 धावा केल्या आणि 78 टी20 मध्ये 1605 धावा केल्या. रैनाने 18 कसोटी सामन्यात 763 धावा केल्या. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप 2011 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 जिंकणाऱ्या संघाचा तो सदस्य होता.