JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / झिम्बाब्वेविरूद्धच्या पराभवानंतर प्रसिद्ध माजी क्रिकेटपटूची पाक कर्णधार बाबर आझमवर जहरी टीका, म्हणाला...

झिम्बाब्वेविरूद्धच्या पराभवानंतर प्रसिद्ध माजी क्रिकेटपटूची पाक कर्णधार बाबर आझमवर जहरी टीका, म्हणाला...

अतिशय अटीतटीच्या मॅचमध्ये झिम्बाब्वेनं पाकिस्तानला एका रनने मात दिली. पाकिस्तानचा हा पराभव माजी खेळाडूंच्या जिव्हारी लागला आहे. अनेकांनी टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन बाबर आझमवर टीका सुरू केली आहे.

जाहिरात

झिम्बाब्वेविरूद्धच्या पराभवानंतर प्रसिद्ध माजी क्रिकेटपटूची पाक कर्णधार बाबर आझमवर जहरी टीका, म्हणाला...

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेली आयसीसी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा रंगतदार स्थितीत आली आहे. स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत अनेक चकित करणारने निकाल बघायला मिळाले आहेत. गुरुवारी (27 ऑक्टोबर) पर्थमध्ये झालेली झिम्बाब्वेविरुद्ध पाकिस्तान मॅच याचाच एक भाग ठरली. अतिशय अटीतटीच्या मॅचमध्ये झिम्बाब्वेनं पाकिस्तानला एका रनने मात दिली. पाकिस्तानचा हा पराभव माजी खेळाडूंच्या जिव्हारी लागला आहे. अनेकांनी टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन बाबर आझमवर टीका सुरू केली आहे. माजी कॅप्टन वसीम अक्रमचाही या टीकाकारांमध्ये समावेश आहे. “पाकिस्तानच्या टीमची कामगिरी बघता ते वर्ल्ड कप जिंकण्याचा निश्चय करून स्पर्धेत उतरलेले नाहीत, असं दिसत आहे,” असं वक्तव्य अक्रम यांनी केलं आहे. A स्पोर्ट्स या चॅनेलवरील कार्यक्रमात बोलताना अक्रम यांनी बाबर आझमवर निशाणा साधला. ‘एनडीटीव्ही’नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. “गधे को भी बाप बनाना पड़ता हैं” A स्पोर्ट्स या चॅनेलवरील कार्यक्रमात माजी फास्ट बॉलर आणि कॅप्टन वसीम अक्रम यांच्यासोबत माजी कॅप्टन शोएब मिलकदेखील उपस्थित होता. शोएबला समोर बघून अक्रम यांनी त्याच्या टीममधील अनुपस्थिचा मुद्दा मांडला. अक्रम म्हणाले, “वर्ल्ड कप जिंकणं माझं टारगेट आहे. त्यासाठी चांगली टीम आवश्यक आहे. जर मला टीममध्ये शोएब मलिक हवा असेल, तर मी निवडकर्त्यांशी वाद घालेन. मला टीममध्ये शोएब मलिक द्या नाहीतर मी कॅप्टन्सी करणार नाही. गरज पडल्यास ‘गधे को भी बाप बनाना पड़ता हैं’, अशी भूमिका एक कॅप्टन म्हणून बाबर आझमनं घ्यायला हवी होती.” **हेही वाचा:** Ind vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात पाऊस? पाहा रविवारच्या मॅचआधी Weather Report याशिवाय वसीम अक्रम म्हणाले, “बाबरची कॅप्टन्सी चांगली नाही. त्याला आणखी हुशार व्हावं लागेल. हे काही गली क्रिकेट नाही, की फक्त आपल्या ओळखीचे खेळाडू त्यात असतील. या मॅचेस ऑस्ट्रेलियात सुरू आहेत. शारजाह, दुबई किंवा पाकिस्तानच्या डेट पीचसारखी ही मैदानं नाहीत.” अक्रम यांच्या मते, शोएब मलिकला टीममध्ये न ठेवणं ही मोठी चूक ठरत आहे. टीमची मिडल ऑर्डर कमकुवत आहे. त्यामुळे शोएब मलिकला टीममध्ये स्थान मिळणं गरजेचं होतं, असं त्यांचं मत त्यांनी कार्यक्रमात व्यक्त केलं. या शिवाय, वसीम अक्रम यांनी बाबरच्या बॅटिंग ऑर्डरवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहेत. “त्यानं दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग केली पाहिजे. मात्र, तो स्वत:ची जागा सोडत नाही. कराची किंग्जमध्ये असताना मी बाबर आझमला एक-दोन वेळा तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करण्याची विनंती केली होती. जेणेकरून आम्ही मार्टिन गप्टिलला ओपनिंगला पाठवू शकू. पण, बाबरनं तेव्हाही ऐकलं नव्हतं. नाईलाजानं आम्ही तेव्हा शर्जिल खानला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं होतं,” असंही त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या