मुंबई, 9 जानेवारी : ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर सध्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात आली. या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 4 ते 8 जानेवारी दरम्यान पार पडकला. हा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसले. ख्वाजाने पहिल्या डावात 195 धावांची नाबाद खेळी केली तर स्टीव्ह स्मिथने 192 चेंडूत 104 धावांचे योगदान दिले. या दोन फलंदाजांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 475/4 धावा करता आल्या.
दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना स्टीव्ह स्मिथच्या गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. स्मिथने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियासाठी 23 वे षटक सुरु असताना आफ्रिकेचा फलंदाज सरेल एरवी फलंदाजीसाठी सज्ज होता. त्यावेळी स्मिथने ऑफ-स्टंपच्या बाहेर छोटी खेळपट्टी मारली, या षटकाचा एक चेंडू, जो टप्पा खाल्ल्यानंतर अपेक्षेपेक्षा जास्त फिरत लेग स्टंपवर गेला. हे ही वाचा : “सूर्यकुमार पाकिस्तानच्या संघात असता तर….” सूर्याच्या खेळीविषयी काय म्हणाला पाकिस्तानचा माजी कर्णधार इरवीने कसा तरी हा चेंडू टोलवला आणि पायाच्या बाजूने खाली पाडला. स्टीव्ह स्मिथची ही गोलंदाजी पाहून सर्वच चक्रावले. सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथने फक्त एक ओव्हर टाकली. त्याच्या ओव्हरमध्ये फलंदाजाला धावा करता आल्या नाहीत, परंतु त्याला विकेट घेण्यात यश आले नाही.