JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / महान टेनिसस्टार नवरातिलोवावर कॅन्सरचा डबल अटॅक, याआधीही आजारावर केलीय मात

महान टेनिसस्टार नवरातिलोवावर कॅन्सरचा डबल अटॅक, याआधीही आजारावर केलीय मात

माजी टेनिसस्टार मार्टिना नवरातिलोवा हिला वयाच्या ६६ व्या वर्षी दोन कर्करोगांचे निदान झाले आहे. याआधीही तिने 2010 मध्ये कर्करोगावर मात केली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 जानेवारी : माजी टेनिस स्टार मार्टिना नवरातिलोवाला आणखी एकदा कर्करोगाचे निदान झाले आहे. सोमवारी तिने सांगितले की, “तिला गळ्याचा आणि स्तनाचा कर्करोग झाला आहे.” मार्टिना नवरातिलोवाला हिने 18 वेळा ग्रँड स्लॅम सिंगल्सचं विजेतेपद पटकावलं होतं. कर्करोगावर याच महिन्यात उपचार सुरू करणार आहे. दोन कर्करोग एकाचवेळी असल्यानं गंभीर आहे. मात्र बरे होऊ शकते आणि मी अनुकूल परिणामाची अपेक्षा करत आहे. हे थोडं कठीण असेल पण मी याविरोधात पूर्ण शक्तीनिशी लढेन असं नवरातिलोवाने म्हटलं आहे. नोव्हेंबर महिन्यात टेक्सासमध्ये सीजन अँड डब्ल्यूटीए फायनलमध्ये भाग घेतला तेव्हा गळ्याजवळ वाढलेल्या लिम्फ नोड पाहिला. बायोप्सीच्या सुरुवातीच्या टप्प्यात गळ्याचा कर्करोग दिसून आला. जेव्हा नवरातिलोवाच्या गळ्याची तपासणी सुरू होती तेव्हा तिला स्तनाचा कर्करोग असल्याचं समजलं. नवरातिलोवाला याआधीही कर्करोग झाला होता. 2010 मध्ये तिने कर्करोगावर मात केली होती. हेही वाचा :  BBLमध्ये वाद संपेनात, एडम झाम्पाने केलं होतं मांकडिंग पण फलंदाज नाबाद; पाहा VIDEO नवरातिलोवाने एकूण 59 ग्रँड स्लॅम जिंकली होती. यात महिला दुहेरीत 31 आणि मिश्र दुहेरीत 10 विजेतेपदांचा समावेश आहे. तिने 2006 मध्ये अमेरिकन ओपनमध्ये बॉब ब्रायनसोबत 50 व्या वाढदिवसाआधी एक महिन्यापूर्वी तिने मिश्र दुहेरीत विजेतेपद मिळवलं होतं. WTA रँकिंगमध्ये विक्रमी 167 एकेरीचे विजेतेपद आणि 331 आठवडे पहिल्या क्रमांकावर राहिल्यानतंर 1994 मध्ये निवृत्ती घेतली होती. मात्र 2000 च्या दशकात अनेकदा कोर्टवर परत येत तिने सामने खेळले आणि जिंकले. हेही वाचा :  बुमराह इज बॅक! टीम इंडियासाठी गूड न्यूज, श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी संघ जाहीर नवरातिलोवाचा 2000 मध्ये इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला होता. सोमवारी एका निवेदनात असंही सांगण्यात आलं की, नवरातिलोवा या महिन्याच्या अखेरीस टेनिस चॅनेलवर ऑस्ट्रेलियन ओपनच्या कव्हरेजसाठी नसेल. पण व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून वेळोवेळी यात सहभागी होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या