JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / जडेजा 'आऊट' अक्षर 'इन', सिलेक्टर्स आणि रोहितकडून या खेळाडूवर अन्याय?

जडेजा 'आऊट' अक्षर 'इन', सिलेक्टर्स आणि रोहितकडून या खेळाडूवर अन्याय?

अक्षर पटेल नाही तर ‘हा’ खेळाडू आशिया कप खेळण्यासाठी दावेदार पण नक्की कुठे बिनसलं?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : आशिया कपचे सामने सुरू आहेत. रविवारी पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. याआधी भारताने पाकिस्तान आणि हाँगकाँग विरुद्ध दोन सामने जिंकले आहेत. रविवारी होणारा सामना महत्त्वपूर्ण असणार आहे. या सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. रविंद्र जडेजा दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर पडला आहे. तर अक्षर पटेलला टीममध्ये खेळण्याची संधी देण्यात आली आहे. याआधी तो स्टँडबाय खेळाडू म्हणून टीममध्ये होता. मात्र अक्षर पटेल टीममध्ये इन झाल्याने क्रिकेटप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. असा एक स्टँडबाय खेळाडू आहे ज्याला पहिली संधी मिळणं अपेक्षित होतं. सिलेक्टर्स आणि रोहितने मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं त्यामुळे या खेळाडूवर अन्याय झाला अशी चर्चा सुरू झाली आहे. रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे तो आशिया कपमधून बाहेर पडला. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरला खेळण्याची संधी देणं अपेक्षित होतं. यासाठी तो मोठा दावेदार मानला जात होता, मात्र त्याऐवजी पटेलला संधी दिली. दीपक चाहरला स्टँडबाय खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. दीपक चाहरला जिथे जिथे संधी मिळाली तिथे त्याने उत्तम कामगिरी करुन दाखवली आहे. टीम इंडियाकडून त्याने केवळ 9 वन डे सामने खेळले असून 15 विकेट्स घेतल्या आहेत. तर 20 टी 20 सामने खेळले असून 26 विकेट्स घेतल्या आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोघांनी आशिया कप 2022 च्या सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. सुपर ४ मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी (४ सप्टेंबर) सामना रंगणार आहे. याआधी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेट्स राखून पराभव केला होता. टीम इंडियाला जडेजाची कमतरता भासू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या