मुंबई, 6 नोव्हेंबर : टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. भारतासह पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड या टीमही सेमी फायनलमध्ये पोहोचल्या आहेत. पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना पाकिस्तानशी तर भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यातली सेमी फायनल बुधवार 9 नोव्हेंबरला तर भारत-इंग्लंड यांच्यातली सेमी फायनल गुरूवार 10 नोव्हेंबरला होईल. या दोन्ही सामन्यांमधल्या विजयी टीम फायनलमध्ये भिडतील. 13 नोव्हेंबरला टी-20 वर्ल्ड कपची सेमी फायनल होणार आहे. भारत-इंग्लंडचं रेकॉर्ड भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत टी-20 च्या 22 मॅच झाल्या आहेत, यातल्या 12 सामन्यांमध्ये भारताचा तर 10 सामन्यांमध्ये इंग्लंडचा विजय झाला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही टीममध्ये 3 मॅच झाल्या आहेत, यातल्या 2 मॅच भारताने आणि एक मॅच इंग्लंडने जिंकली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये शेवटचा सामना 2012 साली झाला. 2007 सालच्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही या दोन टीम आमने-सामने होत्या. या सामन्यात युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला 6 बॉल 6 सिक्स मारत विक्रम केला होता. रेकॉर्ड बघितलं तर फक्त वर्ल्ड कपच नाही तर एकूण टी-20 क्रिकेटमध्ये भारत इंग्लंडवर वरचढ ठरला आहे, पण टी-20 क्रिकेटच्या एका ओव्हरमध्ये मॅचचं चित्र पालटू शकतं, त्यामुळे टीम इंडियाला त्यांच्या रेकॉर्डला साजेसाच खेळ करावा लागणार आहे. सेमी फायनलसाठी ‘हे’ नवे नियम लागू, पाऊस आल्यास पाहा कशी होणार विजेत्याची घोषणा भारतीय टीम रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर.अश्विन, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल इंग्लंडची टीम हॅरी ब्रुक, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, ऍलेक्स हेल्स, मोईन अली, बेन स्टोक्स, सॅम करन, डेव्हिड विली, क्रिस वोक्स, जॉस बटलर, फिलिप सॉल्ट, क्रिस जॉर्डन, आदिल रशीद, मार्क वूड, टायमल मिल्स टीम इंडियासाठी ‘अनलकी अंपायर’ सेमी फायनलला मैदानात उतरणार का नाही? पाहा मोठी अपडेट