मेलबर्न, 23 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानवर शेवटच्या बॉलला विजय मिळवला. पाकिस्तानने दिलेल्या 160 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था अत्यंत खराब झाली. 31 रनवरच भारताने 4 विकेट गमावल्या. नसीम शाहने केएल राहुलला 4 रनवर तर हारिस राऊफने रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवला आऊट केलं, पण विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्यात झालेल्या शतकी पार्टनरशीपमुळे भारताचा विजय झाला. विराटने 53 बॉलमध्ये नाबाद 82 रन केले, यात 4 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता. तर हार्दिक पांड्याने 37 बॉलमध्ये 40 रन केले. शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी 16 रनची गरज होती, त्याआधी विराटने 19व्या ओव्हरच्या शेवटच्या दोन बॉलला हारिस राऊफला दोन सिक्स मारले, पण शेवटच्या ओव्हरमध्ये मोठा वाद निर्माण झाला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने शेवटची ओव्हर डावखुरा स्पिनर मोहम्मद नवाझला दिली. पहिल्याच बॉलवर नवाझने हार्दिकची विकेट घेतली, यानंतर दिनेश कार्तिक बॅटिंगला आला. कार्तिकने लगेचच एक रन काढून विराटला स्ट्राईक दिला.
4 बॉलमध्ये 15 रनची गरज असताना विराटने 2 रन काढले, त्यामुळे 3 बॉलमध्ये 13 रनचं समीकरण बनलं. नवाझने टाकलेला पुढचा बॉल विराटच्या कंबरेवर होता, या बॉललाही त्याने सिक्स मारली. अंपायरनेही हा नो बॉल दिला, त्यामुळे बाबर आझम अंपायरवर संतापला. नवाझच्या नो बॉलमुळे भारताला फ्री हिट मिळाला. पुढचाच बॉल नवाझने वाईड टाकल्यामुळे फ्री हिट कायम राहिला. यानंतर नवाझने विराटला बोल्ड केलं, पण फ्री हिट असल्यामुळे विराटला आऊट देण्यात आलं नाही, पण विराट 3 रन धावला आणि भारताला बाईजच्या 3 रन मिळाल्या. या तीन रनवरही पाकिस्तानने आक्षेप घेतला, पण नियमाप्रमाणे भारताला तीन रन मिळाल्या. ‘बापू’सोबत धोका! थर्ड अंपायरकडून मोठी चूक? भारत-पाकिस्तान सामना पुन्हा वादात शेवटच्या 2 बॉलमध्ये भारताला 2 रनची गरज असताना दिनेश कार्तिक स्टम्पिंग झाला, मग आर.अश्विन बॅटिंगला आला. नवाझने पुढचा बॉलही वाईड टाकला, त्यामुळे भारताला विजयासाठी 1 बॉलमध्ये 1 रनची गरज होती. अश्विनने मिड-ऑफच्या दिशेने बॉल मारत एक रन पूर्ण केली आणि भारताला रोमांचक विजय मिळवून दिला. भारताविरुद्ध झालेल्या पराभवाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटायला सुरूवात झाली. पाकिस्तानी चाहत्यांनी अंपायरनी दिलेल्या नो बॉलवर आक्षेप घेत टीका करायला सुरूवात केली आहे.