Washington sundar
मुंबई, 12 एप्रिल: सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध 8 गडी राखून विजय मिळवला. मात्र, विजयाच्या जल्लोषात संघाला मोठा धक्का बसला आहे. हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) हाताच्या दुखापतीमुळे सनरायझर्स हैदराबाद येथे होणार्या आयपीएलच्या किमान दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. केन विलियमसनचं (Kane Williamson) संयमी अर्धशतक आणि निकोलस पूरनच्या (Nicholas Pooran) आक्रमक बॅटिंगमुळे सनरायजर्स हैदराबादने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs SRH) विजयी रथ थांबवला. IPL 2022: चेन्नईचा दुष्काळ संपणार का? आज RCB चं तगडं आव्हान सोमवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाल्याने त्याला चार षटकांचा कोटा पूर्ण करता आला नाही. वॉशिंग्टन सुंदरने पॉवर प्लेमध्ये 2 षटकांसह 3 षटकांत केवळ 14 धावा दिल्या, परंतु त्याला एकही विकेट मिळाली नाही. सनरायझर्सचे मुख्य प्रशिक्षक मूडी यांनी सामन्यानंतर सुंदरच्या दुखापतीबद्दल अपडेट दिली. सुंदरला उजव्या हाताच्या अंगठ्यामध्ये आणि पहिल्या बोटात जाळी लागल्याने दुखापत झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस आम्ही त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवणार आहोत. आशा आहे की मोठी दुखापत होणार नाही. मात्र, पूर्ण बरे होण्यासाठी त्याला सुमारे एक आठवडा लागेल. अशी शक्यता मूडी यांनी यावेळी व्यक्त केली. सुंदर पुढील दोन सामन्याला मुकणार आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात शुक्रवारी आणि रविवारी सामने होणार आहेत.