JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Athiya Shetty-KL Rahul: अथिया शेट्टी-केएल राहुल कधी करणार लग्न? सुनील शेट्टीनीं दिली मोठी अपडेट

Athiya Shetty-KL Rahul: अथिया शेट्टी-केएल राहुल कधी करणार लग्न? सुनील शेट्टीनीं दिली मोठी अपडेट

लेक अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाबाबत अभिनेता सुनील शेट्टींनी प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,24  ऑगस्ट-   बॉलिवूड आणि क्रिकेट यांचं नातं फारच जुनं आहे. अनेक भारतीय क्रिकेटर्सनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत लग्नगाठ बांधली आहे. या जोड्यांना प्रचंड पसंतदेखील केलं जातं. याचं एक मोठं उदाहरण म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली होय. या दोघांप्रमाणेच सध्या  आणखी एक जोडी प्रचंड चर्चेत आहे. ही जोडी म्हणजे अभिनेत्री अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांची होय. गेल्या अनेक महिन्यांपासून या दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. आता आपल्या लेकीच्या लग्नाबाबत अभिनेता सुनील शेट्टींनी प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी सध्या चांगलीच चर्चेत आहे. अथिया आपल्या चित्रपटांसाठी कमी आणि लव्ह-लाईफमुळे जास्त चर्चेत आली आहे. अथिया गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांनी काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात सोबत हजेरी लावत मीडियासमोर आपलं नातं कन्फर्म केलं होतं. कतरिना-विकी, आलिया-रणबीर यांच्या लग्नानंतर अथिया-राहुलच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. हे दोघे लवकरच लग्न करणार आहेत, असं अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे. दरम्यान आता अथिया शेट्टीचे वडील आणि अभिनेता सुनील शेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया देत खरं काय ते उघड केलं आहे. इन्स्टंट बॉलिवूडने एक एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुनीलला विचारण्यात आलं की, अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. प्लॅनिंग कसं सुरु आहे? ही गुड न्यूज चाहत्यांना कधी मिळणार आहे? याबाबत बोलताना सुनील शेट्टी यांनी म्हटलं, ‘जेव्हा मुलांचा निर्णय होईल तेव्हा लगेच तयारी सुरु होईल. कारण राहुलचं शेड्युल फारच बिझी आहे. तो सध्या आशिया कप, वर्ल्ड कप, साऊथ आफ्रिका टूर, ऑस्ट्रेलिया टूर या सर्व महत्वाच्या गोष्टींची तयारी करत आहे. आणि त्यातून एक दिवस विश्रांती घेतली तर त्या एक दिवसात तर लग्न होय शकत नाही ना. त्यामुळे जेव्हा त्यांना ब्रेक मिळेल यातून तेव्हा लग्न होईल’.

संबंधित बातम्या

**( हे वाचा:** Yuzvendra chahal and Dhanashree Verma : घटस्फोटाच्या चर्चानंतर चहलची पत्नी निघाली माहेरी; व्हिडीओ तुफान व्हायरल ) अथिया शेट्टी आणि केएल राहुल गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनी अथियाचा भाऊ अहान शेट्टीच्या चित्रपटाच्या प्रीमियरला एकत्र हजेरी लावत आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केला होता. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत आपले रोमॅंटिक फोटो शेअर करत असतात. दरम्यान राहुलवर विदेशात एक शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी अथियासुद्धा त्याच्यासोबत होती. या दोघांची जोडी प्रचंड पसंत केली जाते. चाहत्यांना आता त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या