JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Asia Cup 2022: विराट कोहलीच्या ‘त्या’ विधानावरुन गावस्करांचे तिखट सवाल, म्हणाले...

Asia Cup 2022: विराट कोहलीच्या ‘त्या’ विधानावरुन गावस्करांचे तिखट सवाल, म्हणाले...

Asia Cup 2022: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीनं दोन दिवसांपूर्वी एक विधान केलं. याच विधानावरुन आता लिटल मास्टर सुनील गावस्करांनी विराटला काही तिखट सवाल विचारले आहेत.

जाहिरात

विराट कोहली आणि सुनील गावस्कर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 6 सप्टेंबर**:** टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचं एक विधान सध्या चांगलच चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी टीम इंडियानं पाकिस्तानिविरुद्धचा सामना गमावला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला विराट कोहली सामोरा गेला. याच दरम्यान विराटनं कर्णधारपद सोडल्यानंतरचा किस्सा शेअर करताना एक विधान केलं. आणि त्यावरुन माध्यमांमध्ये बरीच चर्चा रंगली. त्यावरुनच आता भारताचे महान क्रिकेटर लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी विराटला सवाल केला आहे. फक्त धोनीचा मेसेज… विराटनं कसोटी कर्णधारपदाच्या राजीनाम्यानंतरचा तो किस्सा सांगताना म्हटलं की अनेकांकडे माझा नंबर आहे. पण मी कर्णधारपद सोडलं तेव्हा फक्त महेंद्रसिंग धोनीचाच मला मेसेज आला. मला मेसेज करणारा तो एकमेव व्यक्ती होता.’

संबंधित बातम्या

विराटच्या विधानावरुन गावस्करांचे सवाल विराटनं केलेल्या या विधानावरुन सुनील गावस्करांनी मात्र तिखट प्रतिक्रिया दिली आहे. गावस्करांनी यावरुन विराटला काही प्रश्नही केले. ‘विराटला केवळ धोनीनच मेसेज केला. मग त्याला अजून कुणी कुणी मेसेज करावा अशी अपेक्षा होती? कृपया करुन विराटनं त्या व्यक्तीचं नाव जाहीर करावं’ असं गावस्करांनी म्हटलंय. गावस्कर इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुढे विचारलं की, कर्णधारपद सोडल्यानंतर विराटला नेमका कुणाकडून आणि कशा प्रकारचा मेसेज हवा होता? प्रोत्साहन देण्यासाठी? आणि जर विराटनं कर्णधारपद सोडलंच होतं तर त्याला प्रोत्साहनाची गरज काय होती. कॅप्टन्सीचा चॅप्टर तर तिथेच संपला होता.’ अशा शब्दात गावस्करांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. **हेही वाचा -** Asia Cup 2022: बीसीसीआयचा माजी सिलेक्टर म्हणतो… जाडेजाच्या जागी पटेलऐवजी हवा होता ‘हा’ खेळाडू दरम्यान गावस्करांनीही 1985 साली जेव्हा त्यांनी कर्णधारपद सोडलं तेव्हाचा किस्सा शेअर केला. त्यावर्षी गावस्करांनी भारताला ऑस्ट्रेलियात झालेली बेन्सन अँड हेजेस विश्व चँम्पियनशीप जिंकून दिली. पण त्यानंतर त्यांनी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी गावस्करांना कुणाचा खास मेसेज किंवा कॉल आला नसल्याचं त्यांनी नमूद केलं. गावस्कर-अनुष्का वाद गावस्करांच्या विराटवरील या प्रतिक्रियेनंतर त्यांच्यात आणि अनुष्का शर्मामधल्या एका वादाची आठवण झाली. एका सामन्यादरम्यान सुनील गावस्करांनी अनुष्काचं नाव घेत विराटच्या फलंदाजीवर कमेंट केली होती. त्यावेळी अनुष्कानं इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट करत गावस्करांच्या त्या टिप्पणीबाबत नाराजी व्यक्त केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या