नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : क्रिकेट आणि राजकारण हे असे क्षेत्र आहेत, ज्यामध्ये काय होईल हे कधी सांगता येत नाही. याआधी अनेक क्रिकेटपटू राजकारणात सामिल झालेले आपण पाहिले आहे. काही क्रिकेटपटू खासदार तर आमदारही आहेत. मात्र आत एक क्रिकेटपटू थेट राज्यपाल झाला आहे. निवृत्तीनंतर खेळाडू वेगळ्या क्षेत्रात जातात मात्र एक दिग्गज फिरकीपटू आता थेट राज्यपाल झाला आहे. हा गोलंदाज आहे श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथैया मुरलीधरन. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मुरलीधरन नव्या इनिंगची सुरुवात करण्यास सज्ज आहे. मुरलीधरनं श्रीलंकेच्या उत्तर प्रांतचा राज्यपाल म्हणून पदभार स्विकारला. मुख्य म्हणजे मुरलीधरनला थेट राष्ट्रपती राजपक्षे यांनी राज्यपाल होण्यासाठी निमंत्रण दिले होते. वाचा- VIDEO : फलंदाजाचा शॉट नडला, चक्क गोलंदाज करतायत हेल्मेट घालून बॉलिंग
वाचा- एका चॅलेंजसाठी दिग्गज क्रिकेटपटूनं केली अर्धी दाढी, सोशल मीडियावर PHOTO VIRAL 47 वर्षांच्या मुरलीधरननं 133 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक 800 गडी बाद करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. 2010मध्ये मुरलीधरननं क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. त्यानं 350 एकदिवसीय क्रिकेटमध्ये 534 तर 12 टी-20मध्ये 13 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळं क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आता एक नवीन जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. वाचा- फ्लॉप खेळी लागली जिव्हारी, स्टार क्रिकेटपटूनं स्वत:लाच केली शिक्षा श्रीलंकेतील नवनिर्वाचित राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी मुरलीधरनची श्रीलंकेच्या उत्तर प्रांताच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींकडून निवडण्यात येणाऱ्या तीन नव्या राज्यपालांमध्ये मुरलीधरनचा समावेश आहे. मुरलीधरनने मार्च 2005 मध्ये चेन्नईमध्ये राहणाऱ्या मधिमलार राममूर्ती यांच्याशी विवाह केला होता. वाचा- ‘प्रत्येक पुरुष लग्नाआधी सिंह असतो, पण….’, धोनीनं दिला सुखी संसाराचा मंत्र अनुराधा आणि तिस्स वितरणाही असतील राज्यपाल राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी मुरलीधरन यांच्याशिवाय अनुराधा यहमपथ यांना पूर्व प्रांताचे तर तिस्स वितरणा यांना उत्तर मध्य प्रांताचे राज्यपाल पद दिले आहे. अनुराधा राष्ट्रीय व्यापार मंडळाच्या अध्यक्ष आणि गॉरमेंट एक्सपोर्ट कंपनीच्या संचालिका आहेत.