केपटाऊन, 28 नोव्हेंबर : क्रिकेटपटू हे त्यांच्या फिटनेससाठी जसे ओळखले जातात तसेच त्यांच्या अतरंगी स्टाईलसाठीही. अभिनेत्यांप्रमाणे क्रिकेटपटूंची स्टाईलही मोठ्या प्रमाणावर फॉलो केली जाते. मात्र सध्या एका दिग्गज क्रिकेटपटूचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात क्रिकेटपटूनं चक्क फक्त अर्धीच दाढी केली आहे. त्यामुळं चाहत्यांमध्ये नक्की या क्रिकेटपटूनं असं का केलं याची उत्सुकता आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॅक कॅलिसचे (Jacques Kallis) नाव क्रिकेट जगतात मोठ्या सन्मानाने घेतले जाते. जगातल्या सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूंपैकी कॅलिस एक आहे. आजही कॅलिसचे रेकॉर्ड खेळाडू तोडू शकलेले नाही. मात्र सध्या कॅलिस सोशल मीडियावर आपल्या एका फोटोमुळे चर्चेत आला आहे. कॅलिसनं इन्स्टाग्रामवर टाकलेल्या या फोटोमध्ये त्यानं अर्धाच चेहरा शेव्ह (दाढी) केल्याचे दिसत आहे. यावर चाहत्यांनी त्याला ट्रोलही केले, मात्र कॅलिसनं या फोटोमागचे खरे कारण सांगितले आहे. वाचा- होय! एक्सरसाईज करणारी तरुणीच आहे, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क कॅलिसनं एका चॅलेंजसाठी केले असे काम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर कॅलिससध्या विश्रांती घेतल आहे. मात्र त्यांना अर्धाच चेहरा का शेव्ह केला असा प्रश्न त्याला चाहत्यांनी विचारल्यानंतर याचे कारण त्याने सांगितले आहे. कॅलिसनं गेंड्यांच्या संरक्षणासाठी हे असे पाऊल उचलले आहे. कॅलिसनं अपलोड केलेल्या फोटोवर, ‘पुढचे काही दिवस मजेशीर असणार आहे. हे सगळं एका चांगल्या कामासाठी आहे’. कॅलिसनं या चॅलेंजचा वापर करून प्राण्यांच्या संरक्षणासाठी मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळं क्रिकेट जगतातून आणि सोशल मीडियावर त्याची स्तुती केली जात आहे. वाचा- फ्लॉप खेळी लागली जिव्हारी, स्टार क्रिकेटपटूनं स्वत:लाच केली शिक्षा
वाचा- मुंबईकरांच्या आनंदावर विरजण! टी-20 सामन्याच्या ठिकाणात बदल जॅक कॅलिसची विक्रमी कामगिरी दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटर जॅक कॅलिसनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1995मध्ये पदार्पण केले. तर, 2014मध्ये कॅलिसनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दक्षिण आफ्रिकेकडून कॅलिसनं 328 एकदिवसीय सामन्यांमध्ये 44.36च्या सरासरीनं 11 हजार 579 धावा केल्या आहेत. यात 17 शतकांचा समावेश आहे. तर, 5 अर्धशतकांच्या मदतीनं 25 टी-20 सामन्यात कॅलिसनं 666 केल्या आहेत. याशिवाय 166 कसोटी सामन्यात 55.37च्या सरासरीनं 13 हजार 289 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये 45 शतक आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे. फलंदाजीबरोबरच कॅलिसनं गोलंदाजीमध्येही कमाल कामगिरी केली आहे. त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 273, कसोटीमध्ये 292 विकेट घेतल्या आहेत. एवढेच नाही तर 2012मध्ये आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना त्यांना विजेतेपदासाठी मोलाची कामगिरी केली होती.

)







