फ्लॉप खेळी लागली जिव्हारी, स्टार क्रिकेटपटूनं स्वत:लाच केली शिक्षा

फ्लॉप खेळी लागली जिव्हारी, स्टार क्रिकेटपटूनं स्वत:लाच केली शिक्षा

असा खेळाडू होणे नाही! संघासाठी जास्त धावा करता आल्या नाही म्हणून स्वत:लाच केली शिक्षा.

  • Share this:

ब्रिस्बेन, 28 नोव्हेंबर : क्रिकेटमध्ये नेहमी चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंसाठी एका सामन्यातील स्वत:ची खेळी जिव्हारी लागते. अशाच एका स्टार खेळाडूनं स्वत:लाच शिक्षा दिली. एका वर्षाच्या बंदीनंतर क्रिकेटमध्ये परतलेल्या स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याने जेव्हा मैदानावर पुनरागमन केले. स्मिथच्या पुनरागमनानंतर स्मिथ जुना फॉर्म टिकवून ठेवू शकणार नाही असे सगळ्यांना वाटत असताना त्यानं दमदार पुनरागमन केले. अ‍ॅशेसपासून स्मिथनं आपला उत्कृष्ट फॉर्म कायम राखला.

वर्ल्ड कपमध्ये चांगली खेळी केल्यानंतर स्मिथनं अ‍ॅशेस मालिकेत सर्वाधिक 774 धावांची खेळी केली. या मालिकेत त्याची सरासरी 110.57 होती, त्यामुळं विराट कोहलीला मागे टाकत त्यानं आयसीसी रॅकिंगमध्येही पहिला क्रमांक मिळवला. मात्र स्मिथ पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत अपयशी ठरला. यानंतर स्मिथनं स्वतःला अनोख्या पद्धतीनं शिक्षा दिली. ब्रिस्बेनमध्ये स्मिथला पाकिस्तानी गोलंदाज यासिर शाहनं बाद केले आणि या फिरकीपटूनं कसोटी क्रिकेटमध्ये माजी ऑस्ट्रेलियाई (Australia) कर्णधाराला तब्बल सातव्यांदा बाद करण्याचा पराक्रम केला.

वाचा-मुंबईकरांच्या आनंदावर विरजण! टी-20 सामन्याच्या ठिकाणात बदल

पाकिस्तान विरोधात झालेल्या या कसोटी सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर स्मिथनं स्वत:ला शिक्षा दिल्याचे मान्य केले. सामन्यानंतर संपूर्ण संघ बसनं घरी गेला मात्र स्मिथनं हॉटेलपर्यंत 3 किलोमीटर धाव घेतली. याबाबत सांगताना स्मिथनं, "जेव्हा मी धावा करत नाही, तेव्हा मी स्वतःला अशीच शिक्षा करतो, आणि जेव्हा मी चांगली कामगिरी करतो तेव्हा मी चॉकलेट खातो. म्हणून जेव्हा जेव्हा असे होते तेव्हा एकतर मी धावतो किंवा मी जिममध्ये जातो", असे सांगितले. तसेच, स्मिथला बाद केल्यानंतर गोलंदाज यासिरने ज्या प्रकारे विकेट साजरी केली त्यानं अजून प्रेरणा मिळाली असल्याचेही यावेळी स्टिव्ह म्हणाला तसेच, यासिरच्या चेंडूवर पुन्हा बाद न होण्याचे प्रयत्न करेन असेही स्मिथ म्हणाला.

वाचा-वजनदार पण शानदार! 140 किलोच्या गोलंदाजानं उडवली फलंदाजांची झोप

वाचा-वर्षभरापासून संघाबाहेर तरी विराट-रोहित तोडू शकले नाही स्टार क्रिकेटपटूचा रेकॉर्ड

दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा दुसरा आणि अंतिम टी-२० अ‍ॅडिलेडच्या मैदानावर खेळला जाईल. हा सामना डे-नाईट असेल. दोन्ही संघातील हा सामना 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत खेळला जाणार आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात पाक संघावर डाव आणि 5 धावांनी विजय मिळवला आणि 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

Published by: Priyanka Gawde
First published: November 28, 2019, 7:46 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading