विराट कोहली
दुबई, 28 ऑगस्ट**:** टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आज दुबईच्या मैदानात विक्रमी सामना खेळणार आहे. पाकविरुद्धचा सामना विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला 100वा सामना असणार आहे. इतकच नव्हे तर वन डे, टी20 आणि कसोटी या तिन्ही फॉरमॅटमध्ये शंभर सामने खेळणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरेल. या स्पेशल सामन्यासाठी विराट कोहली सज्ज झालाय. आणि त्यासाठी त्याला सोशल मीडियातून शुभेच्छाही देण्यात येतायत. आयपीएलमध्ये विराटच्या नेतृत्वात खेळलेल्या एबी डिव्हिलियर्स, सध्याचा आरसीबीचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसीस आणि डेल स्टेन यांनीही विराटला स्पेशल सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. डिव्हिलियर्स, ड्यूप्लेसिसकडून शुभेच्छा आशिया चषकाचं प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्टसच्या शोमधून दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटीवीर आणि टी20तील आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्यनं विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मी माझा सर्वात खास मित्र विराट कोहलीला तिन्ही फॉरमॅटमध्ये शंभर सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू होण्यासाठी शुभेच्छा देतोय. ही खूप मोठी कामगिरी आहे. विराट तुझा खूप अभिमान आहे, या सामन्यासाठी शुभेच्छा!’ डिव्हिलियर्ससह आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसनही विराटसाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. फाफनं म्हटलंय… नमस्ते विराट, या व्हिडीओतून मी तुला शंभराव्या सामन्यासाठी शुभेच्छा देतोय. आजवरच्या तुझ्या कारकीर्दीत आणखी एका मोठ्या विक्रमाची भर पडली आहे. तुझ्यासाठी अजून खूप क्रिकेट बाकी आहे आणि ते पाहण्यासाठी मी खूप उत्साही आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!
विराटचा शतकी सामना विराट कोहलीनं आतापर्यंत 99 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. पण आज दुबईच्या मैदानात उतरताच विराटच्या नावे एक नवा विक्रम जमा होईल. शंभर आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा विराट हा भारताचा केवळ दुसरा खेळाडू ठरणार आहे. विराटच्या आधी रोहित शर्मानं आतापर्यंत 132 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळलेले आहेत.
दुबईत विराट मॅजिक**?** टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा फॉर्मात यावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. आगामी आशिया चषकात विराटकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. महत्वाचं म्हणजे आशिया चषक विराटसाठी लकी आहे.