विराट कोहली, विजय देवरकोंडा
दुबई, 31 ऑगस्ट: विराट कोहली हा टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक. विराटचे जगभर अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावरही विराटचे करोडो फॉलोअर्स आहेत. याच विराटचा जर बायोपिक बनवायचा झाल्यास त्यात विराटची भूमिका कोण करणार? तर या प्रश्नाचं उत्तर एका साऊथच्या सुपरस्टारनंच दिलंय. इतकच नव्हे तर भारत-पाकिस्तान सामन्यावेळी या सुपरस्टारनं आपल्या मनातली ही इच्छा बोलूनही दाखवली. भारत-पाक सामन्यात विराटची फलंदाजी पाहण्यासाठी हा अभिनेता थेट दुबईत पोहोचला होता. विराटचा चाहता असलेला हा अभिनेता आहे दक्षिणेतला सुपरस्टार विजय देवरकोंडा. विराटचा खेळ पाहण्यासाठी दुबईत विजय देवरकोंडानं स्टार फलंदाज विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या लायगर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विजय देवरकोंडा नुकताच दुबईत पोहोचला होता. तिथं त्यानं विराटचा खेळ पाहण्यासाठी भारत-पाकिस्तान सामन्यात हजेरी लावली होती. सामन्यादरम्यान स्टार स्पोर्टसच्या शोमध्ये त्याला कोणत्या खेळाडूची भूमिका करायला आवडेल असा प्रश्न विचारला. तेव्हा विजयनं मोठ्या पडद्यावर विराट कोहलीची भूमिका करायला आवडेल हे उत्तर दिलं. धोनीच्या बायोपिकमध्ये सुशांत सिंगनं काम केलं होतं. तसच विराटचा बायोपिक मला करायचा आहे असं विजय देवरकोंडा म्हणाला.
हेही वाचा - Asia Cup 2022: पाकनंतर हाँगकाँगवरही टीम इंडिया गाजवणार वर्चस्व? दुबईत आज भारताचा दुसरा सामना
लायगरमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री
नुकताच प्रदर्शित झालेला लायगर हा विजय देवरकोंडाचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित या चित्रपटात अनन्या पांडेचीही भूमिका आहे. याशिवाय विजय देवरकोंडानं साऊथमध्ये अर्जुन रेड्डी, डिअर कॉम्रेड, गीता गोविंदन यांसारख्या अनेक चित्रपटात भूमिका साकारली आहे.