JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Mumbai Indians: ज्युनियर 'एबीडी'नं केला हा पराक्रम, मुंबई इंडियन्स खुश! पाहा नेमकं काय घडलं?

Mumbai Indians: ज्युनियर 'एबीडी'नं केला हा पराक्रम, मुंबई इंडियन्स खुश! पाहा नेमकं काय घडलं?

Mumbai Indians: अवघ्या 19 वर्षांच्या ब्रेविसनं सीएसए टी20 लीगमध्ये अवघ्या 35 बॉलमध्ये शतक ठोकलं. तर त्यानंतर टी20 क्रिकेटमध्ये तिसऱ्या सर्वाधिक धावसंख्येची नोंद केली.

जाहिरात

डेवाल्ड ब्रेविसचं वेगवान शतक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑक्टोबर: मुंबई इंडियन्सच्या पलटनमध्ये वर्षभरापूर्वी एक युवा दक्षिण आफ्रिकन खेळाडू सामील झाला. त्यानं आयपीएलच्या काही सामन्यात आपल्या कामगिरीनं खास छाप पाडली. हाच युवा खेळाडू सध्या दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये दमदार फलंदाजी करताना दिसतोय. आज तर त्यानं टी20 क्रिकेटमध्ये एका विक्रमी कामगिरीची नोंद केली. त्याच नाव आहे डेवाल्ड ब्रेविस. अवघ्या 19 वर्षांच्या ब्रेविसनं सीएसए टी20 लीगमध्ये अवघ्या 35 बॉलमध्ये शतक ठोकलं. तर त्यानंतर टी20 क्रिकेटमध्ये तिसऱ्या सर्वाधिक धावसंख्येची नोंद केली. ब्रेविस नावाचं वादळ पोशेफस्ट्रूममध्ये झालेल्या टायटन्स आणि नाईट्स संघातल्या सामन्यात ब्रेविसनं ही कामगिरी बजावली. त्यानं टायटन्सकडून खेळताना अवघ्या 35 बॉलमध्ये शतक ठोकलं. तर 57 बॉलमध्ये नाबाद 162 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 13 फोर आणि 13 सिक्सर्सचा समावेश होता. टी20 क्रिकेटमध्ये ब्रेविसची ही खेळी तिसरी मोठी खेळी ठरली. याआधी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलनं आयपीएलमध्ये 175 धावा ठोकल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाच्या अॅरॉन फिंचनं 172 धावांची खेळी केली होती.

हेही वाचा -  T20 World Cup: टीम इंडियाचा हा मॅचविनर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून आऊट? मोठी अपडेट समोर क्रिकेटविश्वातून कौतुक ब्रेविसच्या या खेळीचं क्रिकेटवर्तुळात कौतुक करण्यात आलं. एबी डिव्हिलियर्ससह अनेक खेळाडूंनी ट्विट करत त्याच्या या कामगिरीची प्रशंसा केली. ब्रेविस दक्षिण आफ्रिकेच्या आगामी टी20 लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या एमआय केपटाऊन संघाचही प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या पलटनमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.

संबंधित बातम्या

जाहिरात

फिल्डिंगमध्येही ब्रेविसची छाप दरम्यान याच मॅचमध्ये बाऊंड्री लाईनवर फिल्डिंग करताना ब्रेविसनं एक जबरदस्त कॅचही पकडलं.

जाहिरात

ब्रेविसचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात ट्रेंडिंग आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या