JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सारा अली खान की सारा तेंडुलकर?कोणाला डेट करतोय शुभमन गिल?पंजाबी अभिनेत्रीच्या ट्विटमधून खुलासा

सारा अली खान की सारा तेंडुलकर?कोणाला डेट करतोय शुभमन गिल?पंजाबी अभिनेत्रीच्या ट्विटमधून खुलासा

भारत-न्यूझीलंड सामन्यात द्विशतक झळकावत युवा क्रिकेटर शुभमन गिल चर्चेत आला आहे. शुभमनवर सध्या विविध स्थरातून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान शुभमन आपल्या खाजगी आयुष्यामुळेदेखील प्रचंड चर्चेत आला आहे. या क्रिकेटरच्या लव्हलाईफने सर्वांनाच संभ्रमात टाकलं आहे.

जाहिरात

शुभमन गिल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जानेवारी-  भारत-न्यूझीलंड सामन्यात द्विशतक झळकावत युवा क्रिकेटर शुभमन गिल चर्चेत आला आहे. शुभमनवर सध्या विविध स्थरातून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान शुभमन आपल्या खाजगी आयुष्यामुळेदेखील प्रचंड चर्चेत आला आहे. या क्रिकेटरच्या लव्हलाईफने सर्वांनाच संभ्रमात टाकलं आहे. शुभमन गिलचं नाव कधी लोकप्रिय क्रिकेटर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरसोबत जोडलं जातं तर कधी अभिनेता सैफ अली खानची लेक सारा अली खानसोबत जोडलं जातं. आता शुभमन नेमका कोणत्या सरळ डेट करत आहे? हे समजणं कठीण झालं आहे. अशातच आता पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवाने एक ट्विट करत सर्वांनाच गोंधळात टाकलं आहे. भारत-न्यूझीलंड सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये क्रिकेटच्या मैदानात शुभमन गिलला पाहून लोक ‘सारा…सारा’ ओरडू लागले होते. शुभमन सारा अली खानला डेट करत आहे की सारा तेंडुलकरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे लोकांना अद्याप समजलेलं नाहीय. परंतु या सगळ्यामध्ये आता शुभमनचं नाव पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवासोबत जोडले जात आहे. दोघांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यावर अभिनेत्रीने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. (हे वाचा: Shubman Gill: शुभमन गिलच्या द्विशतकासोबत आहे ज्युनिअर एनटीआरचं मोठं कनेक्शन; क्रिकेटरच्या ‘त्या’ पोस्टमधून झाला खुलासा **)** पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवाने आपल्या ट्विटमधून सारा आली खान आणि शुभमन गिलच्या डेटिंगच्या चर्चांना पुन्हा एकदा हायलाईट केलं आहे. अभिनेत्रीने आपल्या ट्विटमध्ये साराचं नाव घेत खळबळ माजवली आहे. अभिनेत्रीने हा ट्विट आपल्या आणि शुभमनच्या एका व्हायरल व्हिडीओला अनुसरुन केला आहे. सध्या सोनम बाजवाचा शुभमनसोबतचा एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघे हँडशेक करताना दिसत आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी विविधप्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सोनम आणि शुभमनचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यांनतर नेटकऱ्यांनी सोनम आणि शुभमनचं नाव जोडण्यास सुरुवात केली आहे. काहींनी शुभमन सोनमला डेट करत असल्याचं म्हटलं आहे. या सर्व अफवा पाहून सोनमने ट्विटरवर एक ट्विट केला आहे. ज्यामध्ये तिने साराच्या नावाचा फारच हुशारीने वापर केला आहे. अभिनेत्रीने आपल्या आणि शुभमनच्या फोटोंवरील अफवांना उत्तर देत लिहलंय, ‘ये सारा का सारा झूट है’. अभिनेत्रीने साराचं नाव घेत नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केलाय या विचाराने चाहते बुचकळ्यात पडले आहेत. अभिनेत्रीने नेमकं सारा तेंडुलकर की सारा अली खानबाबत इशारा करत आहे या विचाराने सर्वच संभ्रमात पडले आहेत.

तर काही लोकांनी असाही अंदाज लावला आहे की, साराचं प्रकरण सर्वकाही खोटं आहे. शुभमन आणि साराचं असं काहीही नाहीय. असं अभिनेत्रीला सांगायचं असेल असा अंदाज लावला जात आहे. शुभमन गिल नेमकं कधी आपल्या लव्ह लाईफबाबत अधिकृतपणे खुलासा करतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या