मुंबई, 15 जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज पारपडत आहे. या वनडे मालिकेत आतापर्यंत भारताने दोन सामने जिंकले असून मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. या दोन विजयासह भारताने श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका जवळपास खिशात घातली असून आज देखील भारताचा संघ श्रीलंकेवर भारी पडताना दिसत आहे. भारताचा स्टार खेळाडू शुभमन गिल याने श्रीलंके विरुद्ध दमदार शतक ठोकले आहे. गिलने केवळ 89 चेंडूत शतक करण्याचा पराक्रम केला. श्रीलंके विरुद्ध तिसऱ्या वन डे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला सलामीसाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे दोघे मैदानात आले. परंतु स्वस्तात माघारी परतला. मात्र त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने गिल सोबत चांगली पार्टनरशिप केली. शुभमन गिलने 89 चेंडूत नाबाद शतक ठोकले. हे गिलचे आंतरराष्ट्रीय सामन्यातील आतापर्यंतचे तिसरे शतक आहे. तर वनडे सामन्यांमध्ये गिलचे हे पहिलेच शतक आहे. हे ही वाचा : श्रीलंके विरुद्ध सामन्यापूर्वी टीम इंडिया पोहोचली पद्मनाभस्वामी मंदिरात; पहा PHOTOS परंतु ड्रिंक्स ब्रेकनंतर झालेल्या ओव्हरमध्ये श्रीलंकेचा गोलंदाज राजीथा याने शुभमनची विकेट घेतली. गिल 97 चेंडूत 116 धावांवर बाद झाला. विराट कोहलीने देखील या दरम्यान आपले अर्धशतक पूर्ण केले.