मुंबई, 12 सप्टेंबर**:** श्रीलंकेनं पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयांतर अनेक आजी माजी क्रिकेटर्सनी श्रीलंकन संघावर कौतुकाचा वर्षाव केला. पण पाकिस्तानचा अनुभवी क्रिकेटर आणि माजी कर्णधार शोएब मलिकनं मात्र एक अनोखं ट्विट केलं आहे. मलिकच्या या ट्विटवर कामरान अकमलनं रिप्लाय दिला. आणि त्यानंतर सोशल मीडियात क्रिकेट फॅन्सनी या दोघांची चांगलीच शाळा घेतली. पाकिस्तानच्या पराभवानंतर मलिकचं ट्विट आशिया कप फायनलनंतर मलिकनं ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये त्यानं असं काही लिहिलं की अनेक जण बुचकळ्यात पडले. मलिकनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, ‘मैत्री, संस्कृतीची आवड-नावड यातून कधी बाहेर पडणार. अल्ला नेहमी प्रामाणिक माणसांचीच मदत करतो.’ आता शोएब मलितकनं हे ट्विट करुन कुणाकडे इशारा केलाय आणि त्याचं नेमकं कारण माहित नसलं तरी पाकिस्तानचा आणखी एक क्रिकेटम कामरान अकमलनं यावर रिप्लाय दिला. त्यानं मलिकला म्हटलंय… ‘उस्ताद जी, इतना इमानदार मत बनो…’ या ट्विटनंतर शोएब मलिक आणि कामरान अकमलला लोकांनी मात्र ट्रोल करण्यास सुरुवात केली.
मलिकसाठी संघाची दारं बंद**?** दरम्यान शोएब मलिक सध्या पाकिस्तान संघातून बाहेर आहे. मलिक सध्या 40 वर्षांचा आहे. त्यामुळे तो पुन्हा संघात येईल अशी अपेक्षा कमी आहे. 2021 सालच्या वर्ल्ड कप संघात मलिकचा समावेश होता. पण यंदा मात्र पाकिस्तान संघात त्याला जागा मिळणं मुश्किल आहे.