JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Asia Cup 2022: फायनलमध्ये मोठी दुर्घटना, फिल्डिंगवेळी मैदानातच कोसळला पाकिस्तानी खेळाडू

Asia Cup 2022: फायनलमध्ये मोठी दुर्घटना, फिल्डिंगवेळी मैदानातच कोसळला पाकिस्तानी खेळाडू

Asia Cup 2022: पाकिस्तानचा संघ फिल्डिंग करत असताना बाऊंड्री लाईनवर कॅच पकडताना एक खेळाडू जखमी झाला. कॅच पकडण्याचा प्रयत्नात शदाब खान आणि असिफ अली समोरासमोर आले. पण दोघांमध्ये ताळमेळ नसल्यानं ते एकमेकांवर धडकले.

जाहिरात

शादाब खान आणि असिफ अलीमध्ये धडक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 11 सप्टेंबर:  पाकिस्तान आणि श्रीलंका संघातल्या आशिया चषकाच्या फायनलमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. पाकिस्तानचा संघ फिल्डिंग करत असताना बाऊंड्री लाईनवर कॅच पकडताना एक खेळाडू जखमी झाला. त्यामुळे काही काळ खेळ थांबला होता. श्रीलंकन डावाच्या 19व्या षटकात ही घटना घडली. शादाब खानला दुखापत 19 व्या ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या भानुका राजपक्षेनं मिडविकेटच्या दिशेनं मोठा फटका खेळला. पण तो कॅच करण्याचा प्रयत्नात शदाब खान आणि असिफ अली समोरासमोर आले. पण दोघांमध्ये ताळमेळ नसल्यानं ते एकमेकांवर धडकले. यावेळी शादाब खानच्या डोक्याला जबरदस्त मार बसला. त्यामुळे बराच काळ खेळ थांबला होता. या सामन्यात शादाब खान थोडा अनलकी ठरला. कारण त्याआधी पॉवर प्ले दरम्यान फिल्डिंग करताना बॉल त्याच्या थेट डोक्यावर आदळला होता. तेव्हा काही वेळासाठी त्याला ड्रेसिंग रुममध्ये बसावं लागलं होतं.

संबंधित बातम्या

राजपक्षेची दमदार खेळी दरम्यान या सामन्यात भानुका राजपक्षेच्या नाबाद अर्धशतकामुळे श्रीलंकेनं पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाचव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या राजपक्षेनं खणखणीत अर्धशतक झळकावून श्रीलंकेला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं नेलं. 5 बाद 58 अशी स्थिती असताना राजपक्षेनं आधी हसरंगा आणि करुणारत्नेहसह अर्धशतकी भागीदाऱ्या केल्या.  त्यानं 45 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 71 धावा फटकावल्या. त्यानं हसरंगासह 58 तर करुणारत्नेसह 54 धावांची भागीदारी साकारली. त्यामुळे श्रीलंकेला 6 बाद 170 धावा स्कोअरबोर्डवर लावता आल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या