JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सानिया मिर्झाचा मोठा निर्णय; टेनिसमधून निवृत्तीची घोषणा, 'या' दिवशी खेळणार शेवटचा सामना

सानिया मिर्झाचा मोठा निर्णय; टेनिसमधून निवृत्तीची घोषणा, 'या' दिवशी खेळणार शेवटचा सामना

भारतीय मुलींच्या मनात टेनिस या खेळाबद्दल आवड आणि प्रेरणा निर्माण करण्याचं श्रेय सानिया मिर्झाला जातं. भारताच्या या टेनिससुंदरीनं आता खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 07 जानेवारी : भारतीय मुलींच्या मनात टेनिस या खेळाबद्दल आवड आणि प्रेरणा निर्माण करण्याचं श्रेय सानिया मिर्झाला जातं. हैदराबाद येथील सानियानं, महेश भूपती आणि लिएंडर पेस या पुरुष सहकाऱ्यांसह भारतीय टेनिसला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. भारताच्या या टेनिससुंदरीनं आता खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे. वुमेन टेनिस असोसिएशन (डब्ल्यूटीए) वेबसाइटशी बोलताना सानियानं सांगितलं की, फेब्रुवारी (2023) महिन्यामध्ये दुबईत होणारी डब्ल्यूटीए 1000 स्पर्धा ही तिची शेवटची टेनिस स्पर्धा असेल. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जागतिक क्रमवारीतील माजी अग्रमानांकित दुहेरी खेळाडू असलेल्या सानियाला 2022 च्या अखेरीस निवृत्त व्हायचं होतं. पण, कोपराच्या दुखापतीमुळे ती यूएस ओपनचा भाग होऊ शकली नाही. म्हणून तीनं निवृत्तीचा विचार टाळला. मिश्र आणि महिला दुहेरीत सहा वेळा ग्रँडस्लॅम विजेती सानिया या महिन्याच्या (जानेवारी) शेवटी ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार आहे. ही तिची शेवटची मोठी स्पर्धा असेल. यानंतर ती दुबईत आपल्या कारकिर्दीचा शेवट करण्यासाठी कोर्टमध्ये उतरेल. IND VS SL : तिसऱ्या टी २० सामन्यात भारतीय संघ पडणार श्रीलंकेवर भारी? असा आहे सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवरील भारताचा रेकॉर्ड गेल्या वर्षी सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी सांगितले होतं की, विम्बल्डन ही तिची शेवटची टेनिस स्पर्धा असेल. या स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत तिचा पराभव झाला होता. त्यानंतर तिला दुखापतही झाली. त्यामुळे तिनं आपल्या निवृत्तीची योजना काही काळ पुढे ढकलली. याबाबत सानिया म्हणाली की, मला माझ्या अटींवर काम करायला आवडतं. मला दुखापतग्रस्त अवस्थेत खेळातून बाहेर जायचं नव्हतं. म्हणूनच मी सध्या ट्रेनिंग घेत आहे. सानिया म्हणाली, “भावनिकरित्या पुढे जाण्याची ताकद आता माझ्यात शिल्लक राहिलेली नाही. मी 2003 मध्ये व्यावसायिक टेनिसमध्ये पाऊल ठेवलं होतं. वेळेनुसार आयुष्यातील प्राधान्यक्रम बदलतात. खेळासाठी दररोज माझ्या शरीरावर मर्यादा घालणं ही आता माझी प्राथमिकता राहिलेली नाही.” अकादमीवर लक्ष केंद्रित करणार सानिया मिर्झानं निवृत्तीनंतर ती काय करणार आहे, हेही स्पष्ट केलं आहे. तिनं सांगितलं की, निवृत्तीनंतर तिला दुबईमध्ये असलेल्या तिच्या टेनिस अकादमीवर लक्ष केंद्रित करायचं आहे. सानियानं महिला दुहेरीत तीन आणि मिश्र दुहेरीत तीन ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. याशिवाय, 2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत ती सेमीफायनलपर्यंत पोहचली होती. सानिया मिर्झा आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमुळे चर्चेत राहणारी खेळाडू आहे. काही महिन्यांपूर्वी ती आपल्या घटस्फोटाच्या वृत्तामुळे चर्चेत होती. सानियानं पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न केलेलं आहे. दोघेजण एकमेकांपासून वेगळे होणार असल्याचं म्हटलं जातं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या