JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सचिन तेंडुलकरने घेतला चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद! व्हिडिओ होतोय व्हायरल

सचिन तेंडुलकरने घेतला चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद! व्हिडिओ होतोय व्हायरल

राजस्थानमध्ये एकेठिकाणी मातीच्या चुलीवर अन्न शिजवलं जात आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिला स्वयंपाक करताना दिसत आहेत आणि सचिन त्यांच्याशी बोलताना दिसत आहे.

जाहिरात

सचिन तेंडुलकर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये सक्रिय नसला, तरी तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. सध्या तो राजस्थानमध्ये आहे आणि मागच्या दोन दिवसांत त्याने शेअर केलेल्या दोन व्हिडिओंवरून सचिनलाही चुलीवरच्या जेवणाची भुरळ पडल्याचं दिसतंय. तर, दुसऱ्या एका व्हिडिओत तो नवीन खेळ खेळताना दिसतोय. त्याच्या या व्हिडिओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सचिनने गुरुवारी 29 डिसेंबर रोजी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये राजस्थानमध्ये एकेठिकाणी मातीच्या चुलीवर अन्न शिजवलं जात आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिला स्वयंपाक करताना दिसत आहेत आणि सचिन त्यांच्याशी बोलताना दिसत आहे. सचिनने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन दिलं आहे. “चुलीवर शिजवलेल्या जेवणाची चव नेहमीच अनोखी असते,” असं त्याने म्हटलंय. तर, त्या दोन्ही महिलांनी त्या गहू आणि बाजरीची भाकरी बनवत आहेत, असं सांगितलं. सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला, “मलाही जेवण तयार करता येतं, पण गोल चपाती करता येत नाही. चुलीवर शिजवलेल्या अन्नाची चव वेगळी असते. गॅसवर शिजवलेल्या अन्नापेक्षा ते अधिक चविष्ट असतं.” अशातच सचिन तूप गूळ घेऊन जेवायला बसतो. त्यावर तो म्हणाला, “मी आयुष्यात इतकं तूप कधीच खाल्लं नाही. हे प्रेमाने भरलेलं तूप आहे. नंतर हे देसी तूप आहे का?” असंही त्या महिलांना विचारतो. व्हिडिओवर सचिनचे चाहते, ‘तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात’, ’ त्या महिलांना माहीत नाही की त्यांच्या इथे साक्षात क्रिकेटचा देव आला आहे,’ अशा कमेंट्स करत आहेत.

संबंधित बातम्या

सचिनने याआधी बुधवारीही एक व्हिडिओ शेअर केला होता. तेव्हा तो थायलंडमध्ये सुट्टी घालवत होता. 49 वर्षीय सचिनने थायलंडमध्ये कयाकिंग म्हणजे नौकानयन या खेळातही हात आजमावला. सचिनने वल्ह हातात धरून वल्हवायचं कसं याचेही ट्रेनरकडून धडे घेतले. तेंडुलकर म्हणाला की हे क्रिकेटमधल्या रिव्हर्स स्विंगसारखं आहे आणि तो पहिल्यांदाच या खेळाचा आनंद घेत आहे. हे वाचा -  rishabh pant : ऋषभ पंतला गंभीर दुखापत, डॉक्टरांनी दिली प्रकृतीबद्दल माहिती दरम्यान, अलीकडेच सचिनने मुलांसोबत ख्रिसमसचा सण साजरा केला होता. त्यावेळी त्याने मुलांबरोबर खूप मजा केली होती. ‘हॅपी फीट होम फाउंडेशन’साठी सचिनने मुलांबरोबर वेळ घालवला होता. या वेळी सचिनने मुलांना गिफ्ट्सही दिली होती. क्रिकेटमधून 9 वर्षांपूर्वी रिटायरमेंट घेणाऱ्या सचिनचे जगभरात असंख्य चाहते आहेत. त्याला क्रिकेटचा देव म्हटलं जातं. पण सचिन सध्या नवनव्या ठिकाणी पिरून वेळ घालवताना दिसतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या