JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Vijay Hajare Trophy: जिंकलंस भावा! वर्ल्ड रेकॉर्ड करुनही ऋतुराजनं 'या' खेळाडूशी शेअर केला सामनावीर पुरस्कार

Vijay Hajare Trophy: जिंकलंस भावा! वर्ल्ड रेकॉर्ड करुनही ऋतुराजनं 'या' खेळाडूशी शेअर केला सामनावीर पुरस्कार

Vijay Hajare Trophy: मॅचनंतर कॉमेंटेटरनं जेव्हा मॅन ऑफ द मॅचसाठी ऋतुराजला बोलावलं तेव्हा त्यानं हंगर्गेकरचंही नाव घेण्याची विनंती केली. आणि त्याच्यासोबतच हा पुरस्कार शेअर केला. ऋतुराजच्या या कृतीनं अनेकांची मनं जिंकली.

जाहिरात

ऋतुराजनं हंगर्गेकरसोबत शेअर केला सामनावीर पुरस्कार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 28 नोव्हेंबर: महाराष्ट्रानं विजय हजारे करंडकात आज उत्तर प्रदेशचा धुव्वा उडवून सेमी फायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला. महाराष्ट्राच्या आजच्या विजयाचे हीरो ठरला तो युवा फलंदाज आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड. ऋतुराजनं या सामन्यात द्विशतक तर झळकावलंच पण त्याचबरोबर एकाच ओव्हरमध्ये 7 सिक्स मारण्याचा अशक्यप्राय विक्रम आपल्या नावावर केला. त्यामुळे या मॅचचा खरा मॅन ऑफ द मॅच ऋतुराज गायकवाडच होता. कॉमेंटेटर्सनीही सामन्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी ऋतुराजला पुढे येण्याची विनंती केली. पण त्याचवेळी ऋतुराजनं हा पुरस्कार एकट्यानं न स्वीकारता आणखी एका खेळाडूला पुढे येण्याची विनंती केली आणि त्याच्यासोबत हा पुरस्कार शेअर केला. ऋतुराजचा वर्ल्ड रेकॉर्ड, हंगर्गेकरच्या 5 विकेट्स ऋतुराजसह या मॅचमध्ये महाराष्ट्राच्या विजयात मोलाचं योगदान दिलं ते वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगर्गेकरने. या मॅचमध्ये ऋतुराजच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्रानं उत्तर प्रदेशसमोर 331 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानासमोर उत्तर प्रदेशचा डाव 272 धावात आटोपला. त्यात विकेट किपर आर्यन जुएलनं 159 धावांची खेळी करुन एकाकी झुंज दिली. पण राजवर्धन हंगर्गेकरनं आर्यनसह उत्तर प्रदेशच्या 5 फलंदाजांना माघारी धाडून महाराष्ट्राचा विजय सोपा केला. हेही वाचा -  Vijay Hajare Trophy: कोण आहे तो बॉलर ज्याला ऋतुराजनं ठोकले 7 सिक्स? ‘या’ खास अ‍ॅक्शनमुळे झाली होती चर्चा… ऋतुराजकडून हंगर्गेकरची शिफारस त्यामुळे मॅचनंतर कॉमेंटेटरनं जेव्हा मॅन ऑफ द मॅचसाठी ऋतुराजला बोलावलं तेव्हा त्यानं हंगर्गेकरचंही नाव घेण्याची विनंती केली. आणि त्याच्यासोबतच हा पुरस्कार शेअर केला. ऋतुराजच्या या कृतीनं अनेकांची मनं जिंकली.

ऋतुराजचे 7 सिक्सर्स महाराष्ट्राच्या डावातल्या 49 व्या ओव्हरमध्ये ऋतुराजनं केलेला कारनामा जागतिक रेकॉर्ड बनला. 49 वी ओव्हर घेऊन आलेल्या यूपीचा डावखुरा स्पिनर शिवा सिंगची ऋतुराजनं अक्षरश: लक्तरं काढली. त्यानं प्रत्येक चेंडूवर सिक्सरची नोंद केली. त्यात पाचवा बॉल शिवा सिंगनं नो टाकला. त्यावरही ऋतुराजनं सिक्सर लगावला आणि अख्या ओव्हरमध्ये सात सिक्सर्ससह 43 धावा वसूल केल्या. लिस्ट ए क्रिकेटमधला हा आजवरचा मोठा विक्रम ठरला.

दरम्यान महाराष्ट्रासह आता कर्नाटक, असाम आणि सौराष्ट्र हे चार संघ यंदाच्या विजय हजारे करंडकाच्या सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या