रोहित शर्मा
फ्लोरिडा**, 06** ऑगस्ट : भारत आणि वेस्ट इंडिज संघातला चौथा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना आज फ्लोरिडामध्ये खेळवण्यात येतोय. पाच सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडिया 2-1 अशा फरकानं आघाडीवर आहे. त्यामुळे फ्लोरिडातला आजचा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील. पण या सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा खेळणार की नाही? याबाबत अजूनही संभ्रम आहे. तिसऱ्या टी20त रोहितला दुखापत विंडीज दौऱ्यातल्या तिसऱ्या टी20त फलंदाजी करताना रोहितला दुखापत झाली होती. पाठीच्या दुखण्यामुळं त्यानं केवळ पाच चेंडू खेळून मैदान सोडलं होतं. त्यामुळे रोहित शर्मा आजच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे. पण बीसीसीआयनं काल एक ट्विट करत रोहित फिट असल्याचे संकेत दिले आहेत. या ट्विटमध्ये बीसीसीआयनं एक फोटो शेअर केला आहे. त्यात रोहित शर्मा नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. त्याच्या शेजारी रिषभ पंतही दिसतोय. त्यामुळे रोहित आज सलामीला उतरेल अशी आशा आहे.
हेही वाचा - CWG 2022: ‘रेफ्रिलाच द्या गोल्ड मेडल’… महिला हॉकी संघाच्या पराभवानंतर चाहत्यांचा संताप भारतीय संघात बदल होणार**?** दरम्यान आजच्या निर्णायक लढतीसाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. या मालिकेत गेल्या तीन सामन्यात जेमतेम कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यर आणि आणि गोलंदाजीत महागडा ठरलेल्या आवेश खानला न खेळवण्याचा निर्णय संघव्यवस्थापन घेऊ शकतं. श्रेयसनं गेल्या तीन सामन्यात अनुक्रमे 0, 10 आणि 24 धावा केल्या आहेत. तर आवेश खान भलताच महागडा ठरलाय. त्यानं दुसऱ्या सामन्यात 31 तर तिसऱ्या सामन्यात 47 धावा दिल्या होत्या. त्यामुळे या दोघांऐवजी संजू सॅमसन आणि हर्षल पटेलचा संघात समावेश होऊ शकतो असा अंदाज आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारताला मालिकाविजयाची संधी त्रिनिदाद आणि सेंट किट्समधला सामना जिंकून भारत मालिकेत आघाडीवर आहे. चौथ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत भारतानं विजय मिळवल्यास ही मालिका भारताच्या नावावर होईल. इतकच नाही तर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं मिळवलेला हा सलग तिसरा टी20 मालिकाविजय ठरेल**.**