JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / आईला सरप्राइज द्यायला एकटाच कारने निघाला होता पंत, समोर आलं अपघाताचं कारण

आईला सरप्राइज द्यायला एकटाच कारने निघाला होता पंत, समोर आलं अपघाताचं कारण

भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंतचा आज पहाटे भीषण असा अपघात झाला. आता त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती समोर आली असून तो धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 30 सप्टेंबर : भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंतचा आज पहाटे भीषण असा अपघात झाला. आता त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती समोर आली असून तो धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात आलं आहे. रुर्की पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत हा आईला सरप्राइज देण्यासाठी एकटाच निघाला होता. दिल्लीहून रुर्कीला गाडीतून जात असताना अचानक डुलकी लागली आणि त्यामुळे कारचा अपघात झाला. कारमध्ये त्याच्यासोबत इतर कोणीही नव्हतं. ऋषभ पंत एकटा गाडी चालवत त्याच्या घरी निघाला होता. सध्या त्याची प्रकृती ठीक असून तो बोलू शकतो आणि प्रकृतीला कोणताही धोका नाही. ऋषभ पंतनेच अपघाताबद्दल पूर्ण माहिती दिली आहे. त्याच्यावर डेहराडूनमध्ये मॅक्स रुग्णालयात उफचार सुरू आहेत. हरिद्वार रुलरचे पोलिस अधीक्षक स्वपन किशोर यांनी सांगितले की, ऋषभ पंतची कार हरिद्वार जिल्ह्यातील मंगलोर आणि नरसन यांच्या मध्ये असलेल्या एनएच ५८ वर डिव्हायडरला धडकली. डिव्हायडरला धडकल्यानंतर कारला भीषण आग लागली. दरम्यान, ऋषभ पंतला स्थानिकांनी रुर्की सिव्हील रुग्णालयात दाखल केलं. तिथं प्राथमिक उपचारानंतर पंतला डेहराडूनमध्ये मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आलं. पंतच्या पायात फ्रँक्चर झालं आहे. तर डोक्यात आणि पाठीला मार बसला आहे. हेही वाचा :  ‘ये बंदा बिचारा…’ अपघातानंतर ऋषभ पंतला ओळखू शकले नाही लोक, घटनास्थळावरचा VIDEO उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ऋषभ पंतच्या अपघाताची माहिती घेतली. तसंच त्याच्यावर उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. ऋषभ पंतची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी अशी प्रार्थना त्यांनी केली. याशिवाय पंतच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल असंही पुष्कर धामी म्हणाले.

हेही वाचा :  अपघातात कार जळून खाक, या हायटेक फीचर्समुळे वाचला पंतचा जीव प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पंतची कार रस्त्याच्या दुभाजकावर असलेलं रेलिंग तोडून जवळपास २०० मीटर पुढे गेली. यावेळी गाडी उलटल्याचंही म्हटलं जातंय. तेव्हा ऋषभ पंतने कारचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचाही प्रयत्न केला. मात्र जखमी असल्यानं त्याला शक्य झालं नाही. स्थानिक लोकांनी त्याला कारमधून काढत रुग्णालयात दाखल केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या