JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / भीषण अपघातानंतर ऋषभ पंत पहिल्यांदाच सोशल मीडियावर; प्रकृतीबाबत दिली महत्वाची अपडेट

भीषण अपघातानंतर ऋषभ पंत पहिल्यांदाच सोशल मीडियावर; प्रकृतीबाबत दिली महत्वाची अपडेट

भीषण अपघातानंतर पहिल्यांदाच ऋषभ पंतने सोशल मोडियावर पोस्ट करून त्याच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जानेवारी : भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत त्याच्या अपघातानंतर सध्या प्रकृतीशी झुंज देत आहे. 30 डिसेंबरला पंतचा अपघात झाला होता या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या. पंतवर सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भीषण अपघातानंतर पहिल्यांदाच ऋषभ पंतने सोशल मोडियावर पोस्ट करून त्याच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत याने अपघातानंतर तब्बल 17 दिवसांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली आहे. त्यात ऋषभने म्हंटले, “तुम्ही दिलेल्या सर्व  शुभेच्छा आणि समर्थनासाठी मी नम्र आभारी आहे. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली हे मी सर्वांना कळवू इच्छितो. माझ्या तब्बेतीत सुधारणा होत असून मला दररोज बरे वाटत आहे तसेच माझा आत्मविश्वास देखील बळावत आहे. तुम्ही सर्व माझ्या कठीण काळात मला समर्थन आणि सकारात्मक ऊर्जा देत असल्याने मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो”.

संबंधित बातम्या

30 डिसेंबर रोजी दिल्ली  येथून आपल्या घरी परतत असताना ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषभच्या पायाला, पाठीला, डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातादरम्यान ऋषभ स्वतः गाडी चालवत होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या